AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न, हनिमून पण पतीने अंडकोषाबद्दल लपवली मोठी गोष्ट, 8 वर्षांनंतर भांडाफोड, कल्याणमध्ये नेमकं काय घडलं?

कल्याण मध्ये विवाहापूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेची माहिती लपवून फसवणूक केल्याचा पत्नीने खळबळजनक आरोप केला आहे. मर्चंट नेव्हीत कार्यरत असलेल्या पतीकडून शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याची तक्रार तिने पोलिसांत दाखल केली आहे.

लग्न, हनिमून पण पतीने अंडकोषाबद्दल लपवली मोठी गोष्ट, 8 वर्षांनंतर भांडाफोड, कल्याणमध्ये नेमकं काय घडलं?
प्रतिकात्मक छायाचित्रImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 22, 2026 | 10:38 AM
Share

कल्याणमध्ये वैवाहिक आयुष्याशी संबंधित एक गंभीर तक्रार समोर आली आहे. मर्चंट नेव्हीत कार्यरत असलेल्या पतीने विवाहापूर्वी केलेल्या शस्त्रक्रियेची महत्त्वाची माहिती लपवल्याचा आणि विवाहानंतर शारीरिक, मानसिक छळ केल्याचा आरोप पत्नीने केला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. लग्नापूर्वी पतीने ‘अंडकोष’ काढल्याची माहिती लपवून फसवणूक केल्याचा मोठा आरोप संबंधित महिलेनं केला आहे. तक्रारदार महिला ही उच्चशिक्षित असून मुंबईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. तर पती मर्चंट नेव्हीत नोकरी करत आहे.

आठ वर्षांपूर्वी या महिलेचा विवाह ठाण्यातील मर्चंट नेव्हीत नोकरी करणाऱ्या तरुणाशी हिंदू विवाहपद्धतीनुसार झाला होता. विवाहानंतर दोघं हनिमूनसाठी दक्षिण आफ्रिकेत गेले होते. मात्र तेव्हापासूनच पतीकडून भावनिक आणि शारीरिक दुरावा जाणवत असल्याचा दावा महिलेनं केला आहे. तक्रारीनुसार, तिचा पती मर्चेंट नेव्हीत उच्च पदावर कार्यरत आहे. विवाहापूर्वी त्याच्या एका अंडकोषावर शस्त्रक्रिया करून तो काढण्यात आला होता. मात्र ही महत्त्वाची वैद्यकीय बाब पतीने तसंच त्याच्या आई-वडिलांनी जाणूनबुजून लपवून ठेवली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

विवाहानंतर आयुष्यात लैंगिक संबंधाविषयी अडचणी जाणवू लागल्यानंतर संबंधित प्रकार हळूहळू समोर आला. याबाबत विचारणा केल्यावर पतीने सहकार्य करण्याऐवजी पत्नीला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोपही महिलेनं केला आहे. इतकंच नव्हे तर सासू-सासऱ्यांनीही तिच्यावर दबाव टाकत मानसिक त्रास दिल्याचं तक्रारीत नमूद आहे. विवाहानंतर तब्बल आठ वर्षांनी या प्रकरणाला वाचा फुटली असून, सततच्या त्रासाला कंटाळून महिलेनं अखेर पोलिसांकडे धाव घेतली आहे. दरम्यान, पतीकडून पत्नीला घटस्फोटाची मागणी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी फसवणूक आणि कौटुंबिक छळाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. तर या प्रकरणामुळे लग्नापूर्वी मुलाकडून किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून इतकी मोठी माहिती अशाप्रकारे लपवून फसवणूक झाली, तर काय करावं, अशी चिंता अनेक पालकांना सतावत आहे.

अमरावतीत 15 मिनिटांत 3 घरे फोडली; पोलिसांवर प्रश्नचिन्ह
अमरावतीत 15 मिनिटांत 3 घरे फोडली; पोलिसांवर प्रश्नचिन्ह.
फरार आरोपी कृष्णा आंधळे बाबत धनंजय देशमुखांचा धक्कादायक खुलासा
फरार आरोपी कृष्णा आंधळे बाबत धनंजय देशमुखांचा धक्कादायक खुलासा.
ज्ञानेश्वरी मुंडेंकडून कराड बंधूंवर गंभीर आरोप!
ज्ञानेश्वरी मुंडेंकडून कराड बंधूंवर गंभीर आरोप!.
राम मोहन नायडूंनी राजीमाना द्यावा; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
राम मोहन नायडूंनी राजीमाना द्यावा; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी.
परळीत मृत महादेव मुंडे यांच्या दोन्ही मुलांना मारहाण! गुन्हा दाखल
परळीत मृत महादेव मुंडे यांच्या दोन्ही मुलांना मारहाण! गुन्हा दाखल.
सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका
सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका.
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण.
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?.