
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या स्पष्टवक्त्या विधानांसाठी ओळखले जातात. यावेळी देखील त्यांनी असंच एक विधान केलं आहे. मी नोकरी करण्यासाठी तयार आहे, पण मला दर महिन्याला दोनशे कोटी रुपये हवे आहेत. माझ्या डोक्याची किंमत दोनशे कोटी रुपये आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.
नेमकं काय म्हणाले गडकरी?
नागपूरमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना नितीन गडकरी यांनी म्हटलं की, ‘दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए’ मात्र हे साध्य करण्यासाठी सर्वात आधी शिक्षणाची गरज आहे. मला एका व्यक्तीनं विचारलं होतं, तुम्ही नोकरी करणार का? त्यावेळी मी त्या व्यक्तीला सांगितलं होतं की मी नोकरी करण्यासाठी तयार आहे. पण मला दर महिन्याला दोनशे कोटी रुपये पाहिजे, तरच मी नोकरी करेल कारण माझ्या डोक्याची किंमत 200 कोटी रुपये आहे.
त्यापूर्वी देखील त्यांनी एक मोठं विधान केलं होतं, त्यांनी म्हटलं होतं की कोणताही व्यक्ती आपली जात, भाषा, पंथामुळे मोठा होत नाही, तर त्याच्यामध्ये असलेल्या गुणांमुळे तो मोठा होतो. त्यामुळे मी कधीही जात, धर्म, पंथ पाहून व्यक्तींमध्ये फूट पाडत नाही. मी राजकारणामध्ये आहे. राजकारणामध्ये या गोष्टी खूप चालतात. मात्र मी नेहमी माझ्या विचारांची निवड करतो, मी म्हणतो ज्याला मला मतदान करायचं आहे, तो करेल. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, मला दररोज वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक भेटायला येतात. मी त्या सर्वांना सांगितलं आहे की, ‘जो जातीबद्दल बोलेल त्याला मी जोरदार लाथ मारेन’ असं गडकरी यांनी म्हटलं आहे, ते नागपूरमध्ये बोलत होते.