AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Murder Case : केतनच्या आईला सियाची ती सवय खटकायची, अनेकदा सांगूनही… रेखा अग्रवाल यांचा गंभीर आरोप काय?

लोहगडावर केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू अपघाती नसून तो खून असल्याचे उघड झाले आहे. भावी सून सिया आणि तिचा साथीदार चेतन चौधरी यांनीच त्याला ढकलून मारल्याचा आरोप आहे. रेखा अग्रवाल यांनी सियावर विश्वासघाताचा आरोप करत, दारु पिण्याच्या सवयीबद्दलही खुलासा केला. केतनच्या आई-वडिलांनी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली असून, पोलिसांच्या अटकेनंतर पुढील तपास सुरू आहे.

Ketan Agarwal Murder Case : केतनच्या आईला सियाची ती सवय खटकायची, अनेकदा सांगूनही...  रेखा अग्रवाल यांचा गंभीर आरोप काय?
केतन अग्रवालच्या आईचे सियावर गंभीर आरोप
| Updated on: Jun 24, 2026 | 12:46 PM
Share

भावी सुनेच्या वाढदिवसानिमित्त मुलगा तिच्याोबत लोहगडावर गेला, पण परत आला तो त्याचा मृतदेह… केतन अग्रवालचं निष्प्राण कलेवर पाहून त्याच्या आईने हंबरडा फोडला. मुलाचं लग्न अवघ्या काही महिन्यांवर आलेलं असतानाच त्याचा मृत्यू होणं, हा धक्का रेखा अग्रवाल अजूनही पचवू शकत नाहीयेत. आणि त्यातच आणखी हादरवणारी गोष्ट म्हणजे, जिच्या स्वागताची सगळे आनंदाने तयारी करत होते, त्याच भावी सुनेने त्यांच्या मुलाला मारून त्यांचा आनंद हिरावून घेतला. सियानेच केतनचा खून केल्याचे समोर आल्यावर केतनच्या आई-वडिलांचा आक्रोश आणखी वाढला. तिला माझ्या मुलाशी लग्न करायचं नव्हतं तर तसं स्पष्ट सांगायचं ना, आम्ही लग्न रद्द केलं असतं, माझ्या मुलाचा जीव घ्यायची काय गरज होती, असा सवाल केतनच्या वडिलांनी, उद्विग्न विशाल अग्रवाल यांनी विचारला. तर केतनच्या आईने , रेखा अग्रवाल यांनी सियाबाबत गंभीर आरोप केले आहेत. तिने आपला मोठा विश्वासघात केल्याचे सांगताना, त्यांच्या डोळ्यातील अश्रूंना खळ नव्हता.

मी माझ्या होणाऱ्या सुनेला, सियाला हे स्पष्टपणे सांगितलं होतं की, आमच्या घरात मद्यपान करण्यास परवानगी दिली जाणार नाही., असं रेखा अग्रवाल यांनी नमूद केलं. मात्र असं असूनही सिया ही ड्रिंक्स घ्यायची आणि तिच्या पालकांना याची कल्पना असूनही त्यांनी ही गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवली होती, असा दावाही रेखा यांनी केला.

2-3 वेळा सिया घरी आली 

“ती (सिया) आमच्या घरी दोन-तीनवेळा आली होती. एकदा पूजेसाठी आणि दोन-तीनदा जेवणासाठी. आमच्या घरी मद्यपान करण्यास परवानगी नाही आणि मी तुला पार्ट्यांनाही जाण्याची परवानगी देणार नाही, असं मी तिला तेव्हाच स्पष्टपणे सांगितलं होतं. मात्र असं असूनही सिया  मद्यपान करायची आणि तिच्या पालकांनी ही गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवली होती,” असे रेखा यांनी एका एनडीटीव्हीशी (NDTV) बोलताना सांगितलं.

सिया गोयल आणि तिचा कथित साथीदार चेतन चौधरी यांनी कट रचून केतनची हत्या केली, त्यांनीच माझ्या मुलाला मारलं, असा आरोप करत त्या दोघांनाही कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केतनच्या आईने केली.

हत्येचा तपास सुरू

सियाच्या वाढदिवसापूर्वी सेलिब्रेशनसाठी लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या केतनचा पाय घसरून पडून मृत्यू झाल्याचे आधी मानलं जात होतं. पण अवघ्या आठवड्याभरात या केसचं धक्कादायक सत्य समोर आलं. सिया आणि चेतन यांनीच केतनला ढकललं असा आरोप असून पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. हा मृत्यू अपघाती नव्हता, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. चेतन आणि सियाला 29 जून पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?