AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

तुकाराम मुंढे यांची पुन्हा नागपुरात आयुक्त म्हणून बदली करा, असं शिवसेनेनं पत्रात म्हटलं आहे. (Shivsena Corporator Letter to CM Uddhav Thackeray on IAS Tukaram Mundhe)

तुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र
| Updated on: Sep 18, 2020 | 11:54 PM
Share

नागपूर : कडक शिस्त आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ख्याती असलेले IAS तुकाराम मुंढे नेहमीच चर्चेत असतात. नुकतीच त्यांची नागपूर पालिका आयुक्तपदावरुन बदली झाली आहे. मात्र नागपुरातील कोरोनाची स्थिती पाहता, त्यांची बदली रद्द करुन, पुन्हा नागपूर महापालिका आयुक्तपदी नियुक्त करा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे नागपूर उपजिल्हाप्रमुख आणि नगरसेवक किशोर कुमेरिया यांनी याबाबतचं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. (IAS Tukaram Mundhe Bring back to Nagpur Shivsena Corporator Letter to CM Uddhav Thackeray)

“नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अथक प्रयत्न करुनही कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नाही. आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडली आहे. तुकाराम मुंढे महापालिका आयुक्त असताना नागपुरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. त्यामुळे त्यांची पुन्हा नागपुरात आयुक्त म्हणून बदली करा”, असं किशोर कुमेरिया यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

तुकाराम मुंढे यांची बदली

दरम्यान, 26 ऑगस्ट रोजी तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश निघाले होते. त्यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सचिवपदी झाली. मात्र अवघ्या 15 दिवसात त्यांची बदली रद्द झाली. त्यामुळे त्यांच्या नव्या नियुक्तीची उत्सुकता सर्वांना आहे.

दरम्यान, मुंढे यांच्या बदलीनंतर नागपूर आयुक्तपदाचा कार्यभार राधाकृष्णन बी. यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांची नागपूर आयुक्तपदाची कारकीर्दही नेहमीप्रमाणे चर्चेत राहिली. त्यांनी कोरोनाकाळात कठोर निर्णय घेतले. नागपुरात आयुक्तपदावर कार्यरत असताना तुकाराम मुंढे यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. (IAS Tukaram Mundhe Bring back to Nagpur Shivsena Corporator Letter to CM Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या : 

शहर तुमचं आहे, विकासासाठी एक राहा, जाता जाता तुकाराम मुंढेंचा नागपूरकरांना सल्ला

तुकाराम मुंढे मुंबईला रवाना, नागपुरात समर्थकांची घोषणाबाजी, बदलीविरोधात चीड

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.