AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शहर तुमचं आहे, विकासासाठी एक राहा, जाता जाता तुकाराम मुंढेंचा नागपूरकरांना सल्ला

नागपूरकरांनी मला दिलेलं प्रेम माझ्या अंतःकरणात आहे. नागपूरचं प्रेम अविस्मरणीय आहे, असं तुकाराम मुंढे म्हणाले. (IAS Tukaram Mundhes advice to Nagpurkars)

शहर तुमचं आहे, विकासासाठी एक राहा, जाता जाता तुकाराम मुंढेंचा नागपूरकरांना सल्ला
| Updated on: Sep 11, 2020 | 6:18 PM
Share

नागपूर : मावळते मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांचे आभार मानले. नागपूरकरांनी मला दिलेलं प्रेम माझ्या अंतःकरणात आहे. नागपूरचं प्रेम अविस्मरणीय आहे, असं तुकाराम मुंढे म्हणाले. (IAS Tukaram Mundhes advice to Nagpurkars)

सगळ्यांच्या सहभागातून चांगलं काम होऊ शकतं. तुम्ही असेच प्रेम करत राहा, मी माझं काम करत राहीन. मी जेवढं करु शकलो ते 100 टक्के केलं. शहर तुमचं आहे, आपल्या शहराच्या विकासासाठी एक राहा, शहराचा विकास करा, असा सल्ला तुकाराम मुंढे यांनी दिला नागपूरकरांना दिला.

बदलीविरोधात नागपूरकर रस्त्यावर

नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीविरोधात सर्वसामान्य जनता आक्रमक होणं नवीन नाही. मुंढे मुंबईला रवाना होण्यापूर्वी नागपुरातही हेच चित्र पाहायला मिळालं. तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ सरकारी निवासस्थानासमोर लोकांनी मोठी गर्दी केली.

मुंढे यांच्या बदलीच्या विरोधात नागपूरचे रहिवासी आक्रमक झाले. तुकाराम मुंढे यांच्या घराबाहेर लोकांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. त्यामुळे सुरक्षेसाठी पोलीसांनाही पाचारण करण्यात आलं. लोकांनी गर्दी कमी करावी, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळावं, यासाठी पोलीस आणि मुंढे समर्थकांमध्ये बाचाबाचीसुद्धा झाली.

तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीची उत्सुकता

कडक शिस्तीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारने अवघ्या 15 दिवसात हे आदेश मागे घेतले. आता त्यांची नियुक्ती नेमकी कुठे केली जाणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

(IAS Tukaram Mundhes advice to Nagpurkars)

संबंधित बातम्या  

तुकाराम मुंढे मुंबईला रवाना, नागपुरात समर्थकांची घोषणाबाजी, बदलीविरोधात चीड  

तुकाराम मुंढेंच्या समर्थनात नागपूरची जनता आक्रमक, घराबाहेर गर्दी  

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.