इचलकरंजी समिती सभापतीपद निवडणुका, भाजप-काँग्रेसच्या युतीत ‘ताराराणी’ला स्थान मिळणार?

| Updated on: Jan 02, 2021 | 3:52 PM

इचलकरंजी नगरपालिकेमध्ये सध्या भाजप, काँग्रेस आणि राजर्षि शाहू विकास आघाडी यांची सत्ता आहे Ichalkaranji Nagarpalika Committee Election

इचलकरंजी समिती सभापतीपद निवडणुका, भाजप-काँग्रेसच्या युतीत ताराराणीला स्थान मिळणार?
भाजप, ताराराणी विकास आघाडी आणि काँग्रेस यांच्या युतीचे संकेत
Follow us on

इचलकरंजी : कोल्हापुरातील इचलकरंजी येथील नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुका येत्या बुधवारी (6 जानेवारी 2021) होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. वेगवान राजकीय घडामोडी पाहता भाजपा-काँग्रेस-राजर्षि शाहू विकास आघाडी यांची सत्ता कायम राहणार, की निवडीच्या निमित्ताने वेगळी गणिते जुळणार याकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासन नियमांचे पालन करत ही सभा श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे होणार आहे. (Ichalkaranji Nagarpalika Committee Chairman Election)

विविध विषय समित्यांच्या पार्श्‍वभूमीवर नगरपरिषदेत राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस आणि राजर्षि शाहू विकास आघाडी यांची सत्ता आहे. त्यामध्ये बदल घडण्याची चिन्हे दिसू लागली असून तशी चर्चा रंगू लागली आहे.

या आघाडीच्या सत्तेतून राजर्षि शाहू विकास आघाडीला बाजूला करुन ताराराणी विकास आघाडीला सामावून घेण्याच्या हालचाली दिसत आहेत. त्यामुळे सध्या असलेली सत्ता कायम राहणार की गणित वेगळे मांडले जाणार याची उत्सुकता लागली आहे. या राजकीय घडामोडी बुधवारी सकाळपर्यंत सुरुच राहणार असल्याचे बोलल जाते. त्यामुळे ऐनवेळी काय घडणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

इचलकरंजी नगरपालिकेच्या स्थायी समिती आणि विषय समित्यांचा कार्यकाल 6 जानेवारी 2021 रोजी संपत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी निवडीसाठी बुधवार 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन केले आहे.

सकाळी 11 ते 1 विषय समिती आणि स्थायी समिती सदस्यांचे नामनिर्देशन करणे, दुपारी 1 ते 3 विषय समिती सभापतीसाठी मुख्याधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर करणे, दुपारी 3 ते 3.30 यावेळेत नामनिर्देशन पत्रांची छाननी, दुपारी 3.30 ते 4 वाजेपर्यंत माघार घेण्याची मुदत आणि त्यानंतर दुपारी 4 वाजता निवडी जाहीर करणे असा कार्यकम जाहीर करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

कोल्हापूर महापालिका निवडणूक भाजप ताकदीनिशी लढणार; चंद्रकांत पाटलांची घोषणा

कोल्हापूर महापालिका निवडणूक चंद्रकांत पाटलांचं भवितव्य ठरवणार?

(Ichalkaranji Nagarpalika Committee Chairman Election)