आयएमडीला ज्याची भीती होती शेवटी तेच घडणार; तब्बल 18 राज्यांवर महासंकट, महाराष्ट्राला सर्वात मोठा इशारा

गेल्या काही दिवसांपासून राज्याला पावसाने झोडपून काढलं आहे. आता संकट आणखी गडद झालं असून, हवामान विभागाकडून तब्बल 18 राज्यांना मुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रावर दुहेरी संकट धडकणार आहे.

आयएमडीला ज्याची भीती होती शेवटी तेच घडणार; तब्बल 18 राज्यांवर महासंकट, महाराष्ट्राला सर्वात मोठा इशारा
IMD Maharashtra Monsoon Update
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 09, 2026 | 5:41 PM

महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढलं आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई, पुणे, नाशिक, पालघर, रायगड या जिल्ह्यांसह इतर काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. लोकांच्या घरात पाणी घुसून प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. शुक्रवारी देखील भारतीय हवामान विभागाकडून (IMD) पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून देशातील तब्बल 18 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. या काळात 85 किमी प्रति तास वेगाने वारे वाहाणार असल्याचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

देशातील उत्तर भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना देखील हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत. पर्वतीय प्रदेशात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, मैदानी प्रदेशात वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, महाराष्ट्र, मेघालय, केरल, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, या काळात प्रतितास 80- 85 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात महाराष्ट्रावर दुहेरी संकट असणार आहे.

Loading...

महाराष्ट्रात काय स्थिती?

महाराष्ट्रात आजही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे, मुंबई, ठाणे, जळगाव, पालघर, नाशिक, तसेच घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याला आज भारतीय हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चाळीसगाव तालुका हा नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने, त्या भागातील हवामान प्रणालीचा परिणाम चाळीसगाववरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यात काही ठिकाणी दमदार पावसाची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us