AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारीख लक्षात ठेवा! या दिवशी धो धो पाऊस कोसळणार, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत राज्यातील पाऊस आणि पाणीसाठा यावर चर्चा झाली आहे. पाऊस असाच लांबला तर भविष्यात राज्यात मोठं पाणीसंकट निर्माण होऊ शकतं, अशी चिंता बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे.

तारीख लक्षात ठेवा! या दिवशी धो धो पाऊस कोसळणार, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
rain and monsoonImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 16, 2026 | 2:59 PM
Share

Monsoon Rain Update : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस चांगलाच लांबला आहे. पाऊस लांबल्याने पेरण्यादेखील लांबल्या आहेत. अर्धा जून महिना संपला असून अजूनही मौसमी पाऊस महाराष्ट्रभर पसरलेला नाही. त्यामुळेच चिंता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता राज्य सरकारने पावसाबाबत नवा अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज समोर आल्यानंतर आता शेतकऱ्यांपुढे नवी चिंता निर्माण झाली आहे.

नेमका नवा अंदाज काय?

सूत्रांच्या माहितीनुसार राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत राज्यातील पाऊस आणि पाणीसाठा यावर चर्चा झाली आहे. पाऊस असाच लांबला तर भविष्यात राज्यात मोठं पाणीसंकट निर्माण होऊ शकतं, अशी चिंता बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पावसाबाबत आणखी एक चिंता व्यक्त करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात आणखी तीन दिवस पाऊस पडणार नसल्याचे, मत व्यक्त करण्यात आले आहे. म्हणजेच तीन दिवस पाऊस बरसणार नाही. म्हणजेच राज्यात 20 जूननंतर पाऊस बरसू होऊ शकतो.

राज्यात पाणीबाणी निर्माण होणार?

पाऊस लांबल्याने राज्यभरातील धरणांमधील पाणीसाठा वेगाने कमी होतोय. पावसाने आणखी काही दिवस दडी मारली तर हे पाणीसंकट आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. पाऊस कधी येणार याची सर्वजण वाट पाहात आहेत. पाऊस नसल्याने पाणीबचत करावी, असा सल्ला दिला जात आहे. तसेच मुंबईसारख्या बड्या शहरातही आणखी पाणीकपात करण्यावर विचार सुरू झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भविष्यात मुंबईत 20 टक्क्यांनी पाणीकपात होऊ शकते. सध्या राज्यात 24.41 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्ष याच काळात 31.10 टक्के जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे पाण्याचे हे संकट आणखी भीषण होते की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांनी सरकारच्या सूचनांचे पालन करावे

दरम्यान, सध्यातरी चांगल्या पावसाची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करणे टाळावे. सरकारी सूचनांचे पालन करावे. दुबार पेरणीचे संकट येऊ नये यासाठी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं