AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Update : देशावर आणखी एक मोठं संकट, 14 राज्यांना आयएमडीचा हाय अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा

महाराष्ट्रासह देशात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे, हवामान विभागाकडून अनेक राज्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

IMD Weather Update : देशावर आणखी एक मोठं संकट, 14 राज्यांना आयएमडीचा हाय अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 24, 2025 | 4:52 PM
Share

काही दिवसांपूर्वी देशासह राज्याला पावसानं झोडपून काढलं होतं. पावसानं राज्यात कहर केला, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. दरम्यान आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या नव्या अंदाजानं चिंता वाढली आहे. पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, देशासह राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आजपासून ते 29 ऑगस्टपर्यंत अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

काय आहे हवामान विभागाचा नवा अंदाज?

हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये झारखंड, राजस्थान, ओडिशा आणि बिहार या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 28 आणि 29 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रासह सिक्कीम राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. पंजाब, हरियाणा दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती

दरम्यान कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात देखील पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा राजस्थान आणि पंजाबच्या आसपास सक्रिय असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 25 ऑगस्टपासून ते 29 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्रात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात या कालावधीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.

17 ऑगस्टपासून ते 21 ऑगस्टपर्यंत राज्यात अतिमुसळधार पाऊस झाला, या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. अनेकांच्या घरात पाणी घुसलं, पुराचा मोठा फटका लोकांना बसला. शेतांमध्ये पाणी साचल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आल्यानं चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

Follow Us
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?