AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा, तब्बल इतके तास..

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दाैऱ्यावर होते. नर्मदा प्रकल्पाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यात स्वतंत्र बैठक झाली. यादरम्यान दोघांमध्ये काही तास विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा, तब्बल इतके तास..
Devendra Fadnavis and Amit Shah meeting
| Updated on: Jul 08, 2026 | 1:22 PM
Share

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दिल्ली दाैऱ्यावर होते. यादरम्यान अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. नर्मदा प्रकल्पाच्या मुद्द्याच्या बैठकीत गुजरातचेही मुख्यमंत्री उपस्थित होते. आता राज्याला नर्मदा नदीचे पाणी मिळणार आहे. नर्मदा प्रकल्पाच्या बैठकीनंतर अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एक स्वतंत्र बैठक झाली. बंद दाराआड अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळतंय. ही एक स्वतंत्र बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 7 ते 10 दरम्यान अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. राज्यातील राजकीय स्थिती, कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्तार अशा मुद्द्यांवर दोघांमध्ये काही तास चर्चा सुरू होती. देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दाैऱ्याकडे सर्वांच्या नजरा होत्या. नर्मदा प्रकल्पाबद्दल चर्चा झाली आणि अमित शाह यांनी स्वतंत्र बैठक देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतली.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठे बदल होताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाला मोठे धक्के शिंदेंकडून दिले जात आहेत. 6 खासदारांनी मोठी बंडखोरी ठाकरे गटातून केली. थेट शिवसेना शिंदे गटात या खासदारांनी प्रवेश केला. लोकसभा अध्यक्षांना या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापनेबद्दलचे पत्र देखील दिले. ठाकरे गटात अजून मोठी बंडखोरी होणार असल्याची चर्चा आहे.

शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या या खासदारांपैकी 2 जणांना केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर देखील देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाली. राज्यातील कॅबिनेट मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये काही बदल होणार आहेत. नरेंद्र मोदी आपल्या कॅबिनेटमध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहेत.

यासोबतच काही कॅबिनेट मंत्र्यांना बाहेरचा रस्ता देखील दाखवला जाणार आहे. उपप्रधानमंत्री म्हणून आमित शाह यांच्याकडून नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. राज्यातील अनेक चेहऱ्यांची केंद्रीय मंत्री म्हणून वर्णी लागणार आहे. दिल्लीत काही महत्वाच्या घडामोडी घडताना देखील दिसत आहेत.

Follow Us
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट