AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही पक्षाच्या चेहऱ्यावर शिवाजी महाराजांचा फोटो आणी हृदयात औरंगजेबाचे विचार – भाजपा नेत्याचं मोठं विधान

"आमचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल? याचं उत्तर केंद्रीय नेतृत्व देऊ शकतं. केंद्रीय नेतृत्व योग्य वेळी, योग्य निर्णय घेईल" असंही या नेत्याने सांगितलं.

काही पक्षाच्या चेहऱ्यावर शिवाजी महाराजांचा फोटो आणी हृदयात  औरंगजेबाचे विचार - भाजपा नेत्याचं मोठं विधान
BJP
| Updated on: May 18, 2023 | 2:22 PM
Share

निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी

मुंबई : “काही ठिकाणी दंगली भडकवण्याचा प्रयत्न होतोय, अशी गृह विभागाकडे माहिती आहे. पुण्यात मागे एका राजकीय पक्षाच्या नेत्याने, जेव्हा त्याचं कॉल रेकॉर्डीग समोर आलं, त्यात त्यांनी पुण्यात दंगली भडकवा अस सांगितलं होतं. असे काही राजकीय पक्ष आहेत, त्याचं नाव मी घेणार नाही. गृहविभाग तपास करेल. असे राजकीय पक्ष दंगली भडकवून चांगल्या कामातून सत्तेत यावं, या भावनेतून काम करत नाहीत. धर्म, जातीत द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात” अशी टीका राज्याते सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

“नितेश राणे आणि संजय राऊत यांची आम्ही जोडी केलीय. नितेश राणेंना संजय राऊतांनी उत्तर द्यावं. नितेश त्यांना योग्य पद्धतीने पूर्ण माहिती देईल. जशा पद्धतीचा प्रश्न तशीच उत्तर मिळणार” असं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर कोण निर्णय घेणार ते सांगितलं?

“आमचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल? याचं उत्तर केंद्रीय नेतृत्व देऊ शकतं. केंद्रीय नेतृत्व योग्य वेळी, योग्य निर्णय घेईल. भाजपा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत. आम्ही नेहमी काम करत असतो. ऑक्टोंबरचा कशाला? आम्ही आताही निवडणुकीसाठी तयार आहोत” असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

‘बहुमत सिद्ध करायचं होतं, का पळून गेले?’

सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे आणि संजय. राऊतांवर घणाघाती टीका केली. “हिंमत होती, तर बहुमत सिद्ध करायचं होतं, का पळून गेले? पळपुटेपणा केला, 30 ला बहुमत सिध्द करा म्हटलं, तर 29 ला पळून गेले” अशी बोचरी टीका मुनगंटीवारांनी केली. “काही पक्षांच्या चेहऱ्यावर शिवाजी महाराजांचा फोटो आणी ह्दयात औरंगजेबाचे विचार आहेत” अशी घणाघाती टीका मुनगंटीवार यांनी केली. “उद्धव ठाकरेंना 40 माणसं टिकवता आली नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. भाजपा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन कार्यकारिणी बनवत नाही” असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!