मनमाडमध्ये रुळाला तडे, सुदैवाने 'राज्यराणी'चा अपघात टळला!

मनमाड : नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे रेल्वेचा अपघात टळला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. रेल्वे रुळाला तडा गेला होता. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने अपघात झाला नाही आणि शेकडो लोकांचा जीव बचावला. मनमाड रेल्वे स्थानकापासून जवळच असणाऱ्या रापली गेटवर रेल्वे रुळाला तडे गेले होते. या रेल्वेमार्गावरुन मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस जात होती. त्यावेळी यूनिट नंबर सहाचे कर्मचारी असलेले …

मनमाडमध्ये रुळाला तडे, सुदैवाने 'राज्यराणी'चा अपघात टळला!

मनमाड : नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे रेल्वेचा अपघात टळला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. रेल्वे रुळाला तडा गेला होता. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने अपघात झाला नाही आणि शेकडो लोकांचा जीव बचावला.

मनमाड रेल्वे स्थानकापासून जवळच असणाऱ्या रापली गेटवर रेल्वे रुळाला तडे गेले होते. या रेल्वेमार्गावरुन मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस जात होती. त्यावेळी यूनिट नंबर सहाचे कर्मचारी असलेले चेतन आहिरे आणि काशीनाथ ठाकरे यांनी रेल्वे रुळाला तडा गेल्याचे पाहिले. ते दोघेही समोरुन येणाऱ्या राज्य राणी एक्स्प्रेसच्या दिशेने धावले आणि गाडी थांबवण्यासाठी प्रयत्न केले. गाडी थांबल्याने मोठा अपघात टळला.

त्यानंतर रेल्वे रुळाची दुरुस्ती करण्यात आली आणि त्यानंतर मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली. तोपर्यंत जवळपास एक तास राज्यराणी एक्स्प्रेस तिथेच उभी होती. मात्र, संभाव्य अपघात सुदैवाने टळल्याने प्रवाशांनी एक तास रेल्वे थांबल्यानंतर कुठलाच त्रागा केला नाही.

रेल्वे रुळाला तडा गेल्याने अपघात झाल्याच्या घटना राज्यात किंवा देशात नवीन नाहीत. अनेकदा अशा भीषण अपघतात शेकडो लोकांचे जीव गेल्याचाही इतिहास आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सुद्धा खबरदारी घेण्याची नितांत गरज प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *