मावळ तालुक्यात 65 नागरिकांना प्रसादातून झाली विषबाधा ; जीवितहानी नाही

| Updated on: Nov 23, 2021 | 2:55 PM

गावांमध्ये स्थानिक धार्मिक उत्सवात बनवल्या प्रसादातून ही विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. उत्सवाला उपस्थित असलेल्या ज्या ज्या लोकांनी प्रसादाचे सेवन केले त्यांना उलट्या, पोटदुखी व डोकेदुखीच्या तक्रारी सुरु झाल्या . विषबाधा झालेल्या सर्व लोकांना जवळच्या स्थानिक रुग्णालये तसेच पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर उपचार सुरु केले आहेत. घटनेची माहिती मिळताच पुणे जिल्हा परिषदेने एका पथकाची नेमणूक करत, ते घटनास्थळावर पाहणी करण्यासाठी पाठवण्यात आले.

मावळ तालुक्यात 65 नागरिकांना प्रसादातून झाली विषबाधा ; जीवितहानी नाही
pune zp
Follow us on

पुणे – मावळ तालुक्यातील शिवली व भाडवली या दोन गावातील 65नागरिकांना प्रसादातून विषबाधा झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या गावांमध्ये स्थानिक धार्मिक उत्सवात बनवल्या प्रसादातून ही विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. उत्सवाला उपस्थित असलेल्या ज्या ज्या लोकांनी प्रसादाचे सेवन केले त्यांना उलट्या, पोटदुखी व डोकेदुखीच्या तक्रारी सुरु झाल्या . विषबाधा झालेल्या सर्व लोकांना जवळच्या स्थानिक रुग्णालये तसेच पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर उपचार सुरु केले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पुणे जिल्हा परिषदेने एका पथकाची नेमणूक करत, ते घटनास्थळावर पाहणी करण्यासाठी पाठवण्यात आले. या पथकाने उत्सवा दरम्यान बनवलेल्या प्रसाद व दुपारचे जेवण याची तपासणी केली. त्यात प्रसादासाठी वापरण्यात आलेलया पाण्यात गरजेपेक्षा क्लोरीनाची मात्र अधिक असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. गावातील पिण्याचे पाणी दूषित असल्याने ही घटना घडल्याची चर्चा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दुर्घटनेचे पाणी हे एकमेव कारण नाही
या दुर्घटनेचे दूषित पाणी हे एकमेव कारण असू शकत नाही. केवळ पाण्यामुळंच ही समस्या निर्माण झाली असे म्हटले तरा गावातील इतर लोकही आजारी पडले असते तेही उत्सवाच्या आधी. या उत्सवाला साधारण 250  लोक उपस्थित होते. मात्र त्यातील केवळ 60  ते 65 लोकांनाच विषबाधा झाली अशी माहिती जिल्हापरिषदेचे अधिकारी सुधीर भागवत यांनी दिली आहे. घटनास्थळावरून अन्न व पाण्याचे नमुने घेण्यात आले असून तासपाणीसाठी राज्याच्या आरोग्य प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोग शाळेतील अहवालानंतर नेमके कारण कळू शकणार असल्याचेही ते म्हणले आहेत.

या घटनेत विषबाधा झालेल्या नागरिकांची प्रकृती ठीक आहे. अनेकांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरु असलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापुढे दूषितपाण्याच्या वापरामुळे अशी कोणतीही घटना होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेने दिली आहे.

विवाहित मैत्रिणीची अन्य पुरुषांशी मैत्री खटकली, बलात्काराचा प्रयत्न, नंतर कात्रीने गळ्यावर वार करुन हत्या

Hair Care : केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी जास्वंदाचे फुल अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक!

अल्पवयीन भाचीवर विवाहित मामाची वाकडी नजर, फूस लावून पळवले, आता तुरुंगात रवानगी