अल्पवयीन भाचीवर विवाहित मामाची वाकडी नजर, फूस लावून पळवले, आता तुरुंगात रवानगी

संबंधित तरुण आपल्याच अल्पवयीन भाचीसह फरार झाला होता. आरोपी आधीच विवाहित असून त्याला मुलेही आहेत. ही घटना आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली.

अल्पवयीन भाचीवर विवाहित मामाची वाकडी नजर, फूस लावून पळवले, आता तुरुंगात रवानगी
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 2:12 PM

रांची : झारखंडची उपराजधानी दुमका येथून नात्यांना काळीमा फासणारी एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. आजीला भेटायला आलेल्या अल्पवयीन भाचीला मामाने फूस लावून पळवून नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली. त्याचबरोबर मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र कुटुंबीयांनी काहीही बोलणे टाळले आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील जारमुंडी पोलीस स्टेशन परिसरातील आहे. संबंधित तरुण आपल्याच अल्पवयीन भाचीसह फरार झाला होता. आरोपी आधीच विवाहित असून त्याला मुलेही आहेत. ही घटना आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली.

आरोपी मामाला अटक, तुरुंगात रवानगी

या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी मामाला अटक करत तुरुंगात पाठवले. अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

फूस लावून भाचीला पळवले

अल्पवयीन मुलगी तिच्या पालकांसह बंगळुरु येथे राहते. ती बासुकीनाथला राहणाऱ्या आजीला भेटायला आली होती. मामाची तिच्यावर वाईट नजर होती, असा दावा केला जातो. दोन दिवसांपूर्वी तो भाचीसह पळून गेला होता. जारमुंडीचे पोलीस निरीक्षक नवल किशोर सिंग यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी छापा टाकून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. त्याचवेळी दुष्ट मामालाही पकडले.

अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी

या घटनेबाबत कुटुंबीय मीडियासमोर काहीही बोलणे टाळत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चर्चा रंगली आहे. सध्या पोलिसांनी चौकशीनंतर आरोपीला तुरुंगात पाठवले आहे. त्याचबरोबर अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच आणखी काही खुलासा होऊ शकेल.

संबंधित बातम्या :

पोलीस भरती परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने नाशिकच्या तरुणाचा आयुष्याला पूर्णविराम

एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास, प्रेयसीच्या शेतात प्रेमी युगुलाचा करुण अंत

CCTV VIDEO | वडिलांना हलगर्जी भोवली, कारच्या चाकाखाली चिरडल्याने पोटच्या मुलाचा मृत्यू

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.