विवाहित मैत्रिणीची अन्य पुरुषांशी मैत्री खटकली, बलात्काराचा प्रयत्न, नंतर कात्रीने गळ्यावर वार करुन हत्या

अन्य पुरुषांशी केलेल्या मैत्रीचा राग आल्याने आरोपीने आधी महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिच्याच पिशवीतून कात्री काढून तिच्या मानेवर 8 ते 10 वेळा वार करून तिची हत्या केली. यानंतर अंगावर प्लास्टिकची पिशवी टाकून तो पळून गेला.

विवाहित मैत्रिणीची अन्य पुरुषांशी मैत्री खटकली, बलात्काराचा प्रयत्न, नंतर कात्रीने गळ्यावर वार करुन हत्या
प्रातिनिधिक फोटो


नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील ओखला भागात 37 वर्षीय महिलेची रेल्वे शेडमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली. महिलेच्या मानेवर कात्रीने अनेक वार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी 26 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. आपली या महिलेशी मैत्री होती, मात्र आता ती दुसऱ्या कोणासोबत मैत्री करत होती. म्हणून रागाच्या भरात आपण तिची हत्या केल्याचे आरोपीने सांगितले. खून करण्यापूर्वी त्याने महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचाही प्रयत्न केला.

काय आहे प्रकरण?

दक्षिण-पूर्व दिल्लीच्या डीसीपी ईशा पांडे यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव चांद आलम उर्फ ​​फर्ज आहे. 26 वर्षीय आलम हा इंदिरा कल्याण विहार ओखला फेज-1 येथील रहिवासी आहे. तो विवाहित आहे, मात्र त्याला अपत्य नाही. मयत महिला ही पती आणि दोन मुलांसह त्याच परिसरात राहत होती. पोलिसांनी सांगितले की, आरोपी चांद आलम आणि महिला हे दोघेही पुल प्रल्हादपूर भागातील एका एक्सपोर्ट कंपनीत कपडे शिलाईचे काम करायचे. या दरम्यान त्यांची मैत्री झाली. काही दिवसांपूर्वी आलमला समजले की महिला दुसऱ्या कोणाशी मैत्री करत आहे. याचा त्याला राग आला.

नेमकं काय घडलं?

शनिवारी सायंकाळी ती कारखान्यातून येत असताना आलम तिला वाटेत भेटला. त्याने तिला बदरपूर बस स्थानकापासून तेहखंड रेल्वे ट्रॅकजवळील रेल्वे शेडमध्ये नेले. तिथे त्याने आधी महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिच्याच पिशवीतून कात्री काढून तिच्या मानेवर 8 ते 10 वेळा वार करून तिची हत्या केली. यानंतर अंगावर प्लास्टिकची पिशवी टाकून तो पळून गेला.

पतीच्या तक्रारीनंतर हत्या प्रकरण उघड

रात्री उशिरापर्यंत महिला घरी न पोहोचल्याने दुसऱ्या दिवशी सकाळीच तिच्या पतीने ओखला पोलिस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार नोंदवली. त्याच वेळी रेल्वेच्या शेडवर महिलेचा मृतदेह असल्याची माहिती कोणीतरी पोलिसांना दिली. मृताची ओळख पटल्यानंतर चांद आलमविषयी माहिती समोर आली. एसीपी सरिता विहार आणि एसएचओ जेके सिंह यांच्या पथकाने आरोपी चांद आलमला अटक केली. त्याच्याकडून खुनासाठी वापरलेली कात्रीही जप्त करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास, प्रेयसीच्या शेतात प्रेमी युगुलाचा करुण अंत

CCTV VIDEO | वडिलांना हलगर्जी भोवली, कारच्या चाकाखाली चिरडल्याने पोटच्या मुलाचा मृत्यू

अल्पवयीन भाचीवर विवाहित मामाची वाकडी नजर, फूस लावून पळवले, आता तुरुंगात रवानगी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI