NashikGold:सोने 500 रुपयांनी, तर चांदी 1300 रुपयांनी स्वस्त

नाशिकच्या सराफा बाजार पेठेमध्ये (Nashik) शुक्रवारी (17 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे (Gold) दर 10 ग्रॅममागे 46400, तर चांदीचे (Silver) दर किलोमागे 61700 रुपये नोंदवले गेले.

NashikGold:सोने 500 रुपयांनी, तर चांदी 1300 रुपयांनी स्वस्त
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 2:32 PM

नाशिकः नाशिकच्या सराफा बाजार पेठेमध्ये (Nashik) शुक्रवारी (17 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे (Gold) दर 10 ग्रॅममागे 46400, तर चांदीचे (Silver) दर किलोमागे 61700 रुपये नोंदवले गेले. (In Nashik bullion market, the price of 24 carat gold is Rs 46,400 per 10 grams)

नाशिकच्या सराफा बाजार पेठेमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सराफा बाजारातील दर स्थिर होते, पण शुक्रवारी त्यात घसरण पाहायला मिळाली. मंगळवारी (14 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅम मागचे दर 47500 होते. मात्र, त्यात बुधवारी (15 सप्टेंबर) 150 रुपयांची वाढ होऊन ते 47650 वर स्थिरावले. 22 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे दर मंगळवारी 45000 रुपयांवर गेले होते. बुधवारी या दरात कसलाही बदल झाला नाही. मात्र, गुरुवारी गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचेदर 10 ग्रॅममागे 46900, तर चांदीचे दर किलोमागे 63000 रुपये नोंदवले गेले. यात तीन टक्के जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचेदर 10 ग्रॅममागे 48300 रुपये होते. तर 22 कॅरेट सोन्याचे दर जीएसटीविना 10 ग्रॅममागे 45400, तसेच तीन टक्के जीएसटीसह 46700 रुपये होते. दरम्यान, शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. नाशिकच्या सराफा बाजार पेठेमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46400, तर चांदीचे दर किलोमागे 61700 रुपये नोंदवले गेले. गुरुवारच्या तुलनेत सोने ग्रॅममागे 500 रुपयांनी, तर चांदी किलोमागे 1300 रुपयांनी स्वस्त झाली आहे. आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करत आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत.

दुकानात जाण्याची गरज नाही सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

नाशिकच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली. 24 कॅरेट सोन्याचेदर 10 ग्रॅममागे 46400, तर चांदीचे दर किलोमागे 61700 रुपये नोंदवले गेले. – गिरीश नेवासे, अध्यक्ष, सराफा असोसिएशन, नाशिक (In Nashik bullion market, the price of 24 carat gold is Rs 46,400 per 10 grams)

इतर बातम्याः

नाशिकमध्ये विधिमंडळ समितीने काढली स्मार्ट सिटीच्या कारभाराची पिसे

सुखवार्ताः अमेरिकन क्रिकेट प्रीमिअर लीगमध्ये नाशिकच्या नीरजची निवड

येवल्याची जरतारी पैठणी चक्क डाक विभागाच्या पाकिटावर!

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.