AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक जिल्ह्यात 678 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; निफाडमध्ये सर्वाधिक 110, सिन्नर 94 वर

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज गुरुवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 1 हजार 687 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 683 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात 678 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; निफाडमध्ये सर्वाधिक 110, सिन्नर 94 वर
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Nov 04, 2021 | 12:13 PM
Share

नाशिकः नाशिक जिल्ह्यात सध्या 678 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यात निफाडमधील सर्वाधिक 110 तर सिन्नरमध्ये 94 रुग्ण आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज गुरुवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 1 हजार 687 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 683 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 25, बागलाण 8, चांदवड 24, देवळा 20, दिंडोरी 20, इगतपुरी 7, कळवण 5 , नांदगाव 11, निफाड 110, सिन्नर 94, सुरगाणा 1, त्र्यंबकेश्वर 4, येवला 32 अशा एकूण 361 पॉझिटीव्ह रुग्णांचा समावेश आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 274, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 7 तर जिल्ह्याबाहेरील 36 रुग्ण असून एकूण 678 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 11 हजार 48 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधितांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 2, बागलाण 2, चांदवड 3, दिंडोरी 4, इगतपुरी 1, कळवण 1, नांदगाव 2, निफाड 15, पेठ 1, सिन्नर 15, त्र्यंबकेश्वर 3, येवला 4 अशा एकूण 53 पॉझिटीव्ह रुग्णांचा समावेश आहे.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.09 टक्के, नाशिक शहरात 98.14 टक्के, मालेगावमध्ये 97.12 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.18 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.72 इतके आहे. नाशिक ग्रामीण4 हजार 201, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 3 हजार 998, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 683 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील 4 लाख 11 हजार 48 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 4 लाख 1 हजार 687 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नियम पाळण्याचे आवाहन

सध्या परदेशात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आपल्या देशातही अनेक राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत. सध्या महाराष्ट्र सरकारने निर्बंधामध्ये सूट दिली आहे. हे पाहता लोकांंनी कोरोना नियमांचे पालन करूनच व्यवहार करावेत. सर्वांनी मास्क आवश्य वापरावा. एकाच ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज गुरुवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 1 हजार 687 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 683 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 678 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यात निफाडमधील सर्वाधिक 110 तर सिन्नरमध्ये 94 रुग्ण आहेत. – डॉ. अनंत पवार, नोडल अधिकारी (In Nashik district 678 corona patients, highest 110 in Niphad, Sinnar 94 patients)

इतर बातम्याः

महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये 43 प्रभाग 3 सदस्यीय, तर 1 असेल चौघांचा!

दिवाळीनंतर नाशिकमध्ये पाडापाडी; सोमवारपासून अतिक्रमणांवर महापालिकेचे बुलडोझर!

दिवाळीच्या मुहूर्तावर मोठा दिलासा; गोडतेल लिटरमागे 7 रुपयांनी स्वस्त

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप