Jilha Parishad Election : राज्यात 12 जिल्हापरिषदांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान, कुठं कुठं होणार निवडणूक, जाणून घ्या A टू Z यादी

राज्यात आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. ही निवडणूक येत्या 5 फेब्रुवारी रोजी होणार असून 7 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर केला जाईल.

Jilha Parishad Election : राज्यात 12 जिल्हापरिषदांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान, कुठं कुठं होणार निवडणूक, जाणून घ्या A टू Z यादी
jilha parishad election
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 13, 2026 | 4:43 PM

रग राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. प्रचार शिगेलो पोहोचला आहे. संपूर्ण राज्यभरात एकूण 29 महापालिकांची निवडणूक होणार असून 15 जानेवारी रोजी मतदान होईल तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होईल. दरम्यान, आता या निवडणुकीची राज्यभरात चर्चा असताना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. संपूर्ण राज्यात आता एकूण 12 जिल्हापरिषद आणि 125 पंचायत समितींची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता महापालिकेची निवडणूक संपताच राज्यात पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

१२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीत निवडणूक

राज्यात १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीत निवडणूक होणार आहे. खालील विभागात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी ही निवडणूक होईल.

कोकण विभाग- रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग

पुणे विभाग – पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर

संभाजीनगर विभाग – संभाजीनगर परभणी धाराशीव व लातूर

राज्यात २५ हजार ४८२ मतदान केंद्रे

या निवडणुकीत प्रत्येक मतदारांना दोन मते द्यायचे आहेत. एक मत जिल्हा परिषद आणि दुसरं मत पंचायत समितीसाठी द्यायचे आहे. इच्छुकांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. तसेच ज्या ठिकाणी जारा राखीव आहेत, तिथे उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. निवडून आल्यावर सहा महिन्यात जातप्रमाणपत्र द्यावं लागेल. नाही दिलं तर त्याची निवड रद्द होईल. राज्यात २५ हजार ४८२ मतदान केंद्रे आहेत. ईव्हीएमच्या मदतीने ही निवडणूक होईल. या मतदानासाठी ५५ हजार कंट्रोल युनिट, १ लाख १० हजार बॅलेट युनिट, २५ हजार ४८२ मतदान केंद्रात वीज, पिण्याचे पाणी शौचालय अशी व्यवस्था केलेली असेल. काही पिंक मतदान केंद्र असतील.