10 जिल्ह्यांमध्ये मोठ संकट, भारतीय हवामान विभागाचा थेट येलो अलर्ट, पुढील काही तास..

भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला आहे. आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णता वाढण्याचे संकेत आहेत. भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे नागरिकांनी दुपारच्यावेळी घरातून बाहेर पडताना काळजी घ्यावी.

10 जिल्ह्यांमध्ये मोठ संकट, भारतीय हवामान विभागाचा थेट येलो अलर्ट, पुढील काही तास..
Heat wave warning
| Updated on: Mar 09, 2026 | 7:18 AM

फेब्रुवारी महिन्यात हवामानात सतत बदल होताना दिसला. कधी थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती होती. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच उष्णता वाढत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अनेक भागात थेट उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. दुपारच्यावेळी कडाक्याचे उन्ह आहे. उकाडा प्रचंड वाढला आहे. अकोला आणि अमरावतीमध्ये उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला. विदर्भात सूर्य आग ओकताना दिसत आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात आज उकाडा अधिक असेल. आज या भागात उष्णतेचा येलो अलर्ट दिला आहे. कोकणात दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. आज दिवसभर तापमानात चढउतार बघायला मिळेल. फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच उष्णता वाढणार आहे. 1 जानेवारी रोजी झालेल्या पावसानंतर राज्यातील थंडी गायब झाली आणि आता उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे.

अकोला येथे देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोल्यात 40.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. फक्त अकोलाच नाही तर वाशिम, अमरावती, वर्धा सोलापूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट बघायला मिळाली. पारा 40 अंश सेल्सिअसच्या आसपास होता. निफाडमध्ये राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. निफाड येथे 12.0 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने आज दमट आणि उष्ण हवामानाचा येलो अलर्ट जारी केला आहे. पूर्व दिशेकडून उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात झाल्याने महामुंबईला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईत हवामान उष्ण राहील.

दरम्यान, रविवारी मुंबईचे कमाल तापमान 35 अंश नोंदविण्यात आले असले तरी यामध्ये सोमवारी वाढ होण्याची शक्यता आहे. महामुंबई मध्ये उष्णतेची लाट 11 मार्चपर्यंत कायम राहणार असून 12 आणि 13 तारखेला तापमान किंचित खाली येईल. तर उष्णतेच्या लाटेचा विपरीत परिणाम म्हणून रायगड, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि मुरबाड या परिसरात कमाल तापमानाचा पारा 40 ते 42 अंशांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us