12 जिल्ह्यांवर आसमानी संकट, हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तास धोक्याचे..

राज्यासह देशातील हवामानात मोठा बदल झाल्याचे बघायला मिळतंय. भारतीय हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा मोठा इशारा दिला. आज विदर्भासह राज्यातील जवळपास सर्वच भागात पाऊस होण्याची शक्यता आहे.

12 जिल्ह्यांवर आसमानी संकट, हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तास धोक्याचे..
rain alert
| Updated on: May 31, 2026 | 7:12 AM

गेल्या काही दिवसांच्या उष्णतेपासून मोठा दिलासा नागरिकांना मिळू शकतो. विदर्भात सूर्य आग ओकताना दिसला. आता भारतीय हवामान विभागाने विदर्भासह राज्यातील जवळपास भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला. विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, धुळे, नंदूरबार, बीड, नांदेड, हिंगोली आणि परभणी या भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. विदर्भात पारा 43 अंश सेल्सिअसच्या पुढेच होता. काल ब्रह्यपुरी येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. ब्रह्यपुरी येथे 45.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. देशातील उच्चांकी तापमानाची नोंद राजनंदगाव येथे झाली. उत्तर प्रदेशमध्ये चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. 1 जूनपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा मोठा इशारा देण्यात आला.

आज उष्णतेपासून दिलासा मिळणारा दिवस आहे. भारतीय हवामान विभागाने कोणत्याही प्रकारचा इशारा उष्णतेचा आज दिला नाहीये. मागील काही दिवसांपासून उष्णतेचा रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून सातत्याने दिला जात होता. अमरावती जिल्ह्यात एकीकडे सूर्य आग ओकत असताना आणि नागरिक प्रचंड ‘हीट वेव्ह’मुळे होरपळून निघाले असतानाच वरूड परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

तब्बल एक तासापेक्षा अधिक काळ या भागात प्रचंड गारपीट झाली. गेल्या काही दिवसांपासून अमरावतीकर भीषण उष्णता आणि असह्य उकाड्याचा सामना करत होते. अशा परिस्थितीत झालेल्या या मुसळधार पाऊस आणि गारपीटीमुळे संपूर्ण परिसरातील तापमानात कमालीची घट झाली असली तरी संत्रा मोसंबी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.

मुंबईमध्ये तर सकाळीच पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाने एकच तारांबळ उडाली. जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक भागांत पहाटेच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसानी हजेरी लावली. पावसापूर्वी तब्बल अर्ध्यातासापर्यंत जोरदार वादळ सुरू होते. वादळानंतर काही वेळाने पाऊस झाला. पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन वादळाला सुरुवात झाली. जळगाव शहरात 15 ते 20 मिनिटापर्यंत मुसळधार पाऊस झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us