आसमानी संकट राज्यावर, उष्णतेपासून काहीसा दिलासा, तब्बल 6 जिल्ह्यांमध्ये धोका..

मागील काही दिवसांपासून राज्यात हवामानात मोठा बदल होत आहे. कुठे उष्णता तर कुठे पाऊस अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. थेट पावसाचा इशारा देण्यात आला. उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

आसमानी संकट राज्यावर, उष्णतेपासून काहीसा दिलासा, तब्बल 6 जिल्ह्यांमध्ये धोका..
Warning
| Updated on: May 29, 2026 | 7:13 AM

उष्णतेपासून मोठा दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. विदर्भात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट आहे. त्यामध्येच राज्यातील इतर भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उष्णता कायम राहणार आहे. देशातील उच्चांकी तापमानाची नोंद राजस्थानच्या श्रीगंगानगर येथे झाली. श्रीगंगानगर येथे 48.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ येथे 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. आज गोदिंया, गडचिरोली, वर्धा, नागपूर, अमरावती, बुलढाणा या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिला. राज्यात काहीसा दिलासा उष्णतेपासून मिळल्याचे बघायला मिळतंय.

राज्यातील हवामानात सतत बदल होत आहे. मॉन्सूनही लवकरच राज्यात दाखल होईल. यंदा काही शहरांमध्ये उष्णतेने चांगलाच कहर केला. तब्बल महिनाभराच्या उकाड्याने नंतर अमरावती जिल्ह्यात पावसाने तात्पुरता दिलासा दिला.  सायंकाळी अमरावती शहर आणि जिल्ह्यात वादळीवारासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली. हा मान्सून पूर्व पाऊस असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

ग्रामीण भागातील ब्राह्मणवाडा सह रेवसा येथे गारपिटीसह पाऊस झाला. नागरिक या जीवघेण्या उकाड्यापासून त्रस्त झाले आहेत. दिवसासह रात्रीही उष्णता जाणवत होती. वाशिम जिल्ह्यात उष्णतेचा तीव्र तडाखा कायम असून त्याचा मोठा परिणाम आता जलसाठ्यांवर दिसून येत आहे. जिल्ह्यातील अनेक नद्या, नाले आणि लघुप्रकल्प कोरडे पडू लागले आहेत. जिल्ह्यात एकूण 162 प्रकल्प असून त्यामध्ये 2 मध्यम तर 160 लघुप्रकल्पांचा समावेश आहे. 160 लघुप्रकल्प पैकी तब्बल 78 लघुप्रकल्पांनी तळ गाठल्याचे चित्र आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानाचा मोठा फटका आता फळबागांना बसू लागला आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी आणि परिसरातील अनेक गावांमध्ये केळीच्या बागा अक्षरशः करपून गेल्याचे चित्र समोर आले आहे. सततच्या कडक उन्हामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे केळीच्या झाडांची वाढ खुंटली. पानं पूर्णपणे सुकून गेली आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us