AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसा अंधार, ताशी 130 किलोमीटर वेगाने भारतावर संकट, हाय अलर्ट जारी, विमाने रद्द, 3 राज्यात मोठा धोका, सूर्य प्रकाशही…

देशावर मोठं संकट आले असून तात्काळ चेतावणीनंतर विमान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. राखेच्या ढगांमुळे भारतावर मोठं संकट आले. इथिओपियन ज्वालामुखीतील राखेचे ढग भारतात पसरले आहेत. यामुळे मोठा परिणाम भारतात झालाय.

दिवसा अंधार, ताशी 130 किलोमीटर वेगाने भारतावर संकट, हाय अलर्ट जारी, विमाने रद्द, 3 राज्यात मोठा धोका, सूर्य प्रकाशही...
Ethiopian volcanic
| Updated on: Nov 25, 2025 | 8:14 AM
Share

देशावर मोठं संकट आलं असून थेट अनेक विमाने रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास इथिओपियाच्या हेले गुब्बी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या राखेचा मोठा ढीग दिल्लीत आणि देशात पोहोचला. पहिल्यांदाच राजस्थान आणि त्यानंतर दिल्ली असे करून राखेचा ढीग पुढे पुढे सरकताना देशात दिसतोय. यामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून धूळ दिसत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अंधूक ढग दिसतील आणि ढगाळ वातावरण दिसेल. हे राखेचे ढग लाल समुद्र ओलांडून ताशी 130 किलोमीटर वेगाने भारताकडे सरकत होते. भारताच्या जाैधपुर आणि जैसलमेरमध्ये हे ढग पोहोचले आणि त्यानंतर दिल्लीच्या दिशेने पुढे सरकत होते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे राखेचे ढग जमिनीपासून 45,000 फूट उंचीवर आहेत. मात्र, याचा परिणाम असा झाला की, कित्येक विमाने रद्द करावी लागली.

भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सकाळी सूर्य प्रकाशावर परिणाम करणाऱ्या राखेमुळे वेगळा आणि जास्त चमकेल. काही वेळ अंधार होईल. या राखेच्या मोठ्या ढगामुळे देशातील वायूप्रदूषणही झपाट्याने वाढल्याचे बघायला मिळतंय. दिल्ली, राजस्थान आणि हरियाणातील अनेक भागांमध्ये वातावरणात अधिक प्रमाणात धूळ दिसत आहे. दिल्लीतील हवा सध्या अत्यंत खतरनाक असल्याचे अमेरिकेतील हवामान अंदाज वेबसाइट AccuWeather म्हटले. दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या बहुतेक भागात सकाळी 6 वाजता AQI 300 होता.

इंडिया मेटस्काय वेदरच्या मते, इथिओपियन ज्वालामुखीतील राखेचे ढग बहुतेक सल्फर डायऑक्साइडचे बनलेले आहेत. इथिओपियाच्या हेले गुबिन ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर भारताच्या डीजीसीएने विमान कंपन्यांना एक सूचना जारी केली आहे. ज्वालामुखीच्या राखेमुळे विमानाच्या इंजनावर गंभीर परिणाम होऊ शकतात आणि अशात विमान उड्डाण अत्यंत धोकादायक आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरून जाणारे अनेक विमाने रद्द करण्यात आली आहेत.

रविवारी सकाळी इथिओपियामध्ये झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे राखेचा मोठा लोट 10 ते 15 किलोमीटर उंचीवर गेला. राखेचे बारीक कण विमानाच्या इंजिनांना गंभीर नुकसान करू शकतात.विशेषतः मस्कत एफआयआर परिसरात अत्यंत सावधगिरीने ऑपरेशन्स करण्यास सांगण्यात आले आहे. आता या ज्वालामुखीच्या राखेच्या ढगामुळे देशात मोठे संकट आल्याचे बघायला मिळतंय.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.