AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज पुन्हा या 6 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा, राज्यावर संकट कायम, थेट..

राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आजही राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. थेट येलो अलर्ट जारी करण्यात आला.

आज पुन्हा या 6 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा, राज्यावर संकट कायम, थेट..
Rain
| Updated on: Mar 20, 2026 | 7:18 AM
Share

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होताना दिसत आहेत. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. मार्च महिन्यात पाऊस पडत आहे. अवकाळी पावसासह गारपिटीने नको नको केले. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात विविध भागात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. भारतीय हवामान विभागाकडून 17 ते 20 मार्चपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा दिला होता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. कालही राज्यातील काही भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. काही भागात गारपिटीनेही हजेरी लावली होती.

सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशिव, चंद्रपूर आणि यवतमाळ येथे ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडाकटाडासह जोरदार पाऊस हजेरी लावेल. या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. वाशिम येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. वाशिम येथे 38.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. धुळे येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात नीचांकी 15 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

सातपुडा परिसरात अवकाळी पावसाचा भीषण तडाखा बघायला मिळाला. अवकाळी पावसासह गारपिटीच्या फटका शेती पिकांना बसला. कडाक्याच्या उन्हात अचानक पारा घसरला. अवकाळीचा सर्वाधिक फटका सातपुड्यातील कैरी आंबा पिकांना हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती. पडलेल्या गारा वेचण्यासाठी लहान मुलांची एकच धावपळ उडाली, मात्र शेतकरी चिंतेत आहे.

सांगली जिल्ह्यांमध्ये जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशी मिरज तालुक्यात गारपीटीने झोडपून काढले आहे. सलगरे सह आसपासच्या परिसरामध्ये गारांचा तुफान पाऊस झाला आहे, त्यामुळे रस्त्यावर आणि शेतांमध्ये गारांचा खच बघायला मिळाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीचा फटका, सलगरे सह आसपासच्या शेतीला मोठ्या प्रमाणात बसला आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी