12 ते 5 घराबाहेर पडू नका, सावधान, राज्यातील तब्बल तीन जिल्ह्यांमध्ये..

नुकताच अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. यादरम्यान दुपारी घरातून बाहेर पडणे टाळा. आज भारतीय हवामान विभागाने उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला. दुपारी 38 च्या पुढे उच्चांकी तापमान जाण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळावे.

12 ते 5 घराबाहेर पडू नका, सावधान, राज्यातील तब्बल तीन जिल्ह्यांमध्ये..
Heat
| Updated on: Mar 24, 2026 | 9:43 AM

मार्च महिना संपत आहे. यादरम्यान कडाक्याचे उन्ह काही भागात पडले आहे. यादरम्यानच मराठवाड्यासह काही भागात पाऊस अजूनही हजेरी लावत आहे. भारतीय हवामान विभागाने उष्णतेचा नुकताच मोठा अलर्ट जारी केला. आज दुपारी घराबाहेर पडणे टाळाच. अतिमहत्वाचे काम असेल तर टोपी, रूमाल आणि पाण्याची बॉटल घेऊनच घराबाहेर पडा. भारतीय हवामान विभागाने आज उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट दिला. यामुळे उन्हाळ्यात आजारी पडायचे नसेल तर शक्यतो आज दुपारी घराबाहेर पडणे टाळाच. उष्णता आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला. राज्यातील एका भागात जोरदार पाऊस सुरू आहे तर दुसऱ्या भागात थेट उष्णता आणि दमटचा इशारा देण्यात आला. आज दुपारी 12 ते 5 घराबाहेर पडणे टाळा, यादरम्यान उन्हाचा कडाका अधिक असेल. जर आपण यादरम्यानच्या काळात घराबाहेर पडलो तर उन्ह लागल्याने आजारी पडण्याची शक्यता अधिक आहे.

मार्च महिन्यातच उन्हाचा चटका वाढल्याचे बघायला मिळतंय. यादरम्यान भारतीय हवामान विभागाने आज ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला. सोमवारपेक्षा मंगळवारी उष्णता अधिक असेल असा अंदाज आहे. यासोबतच नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले. मुंबईमध्ये पारा 36 अंश सेल्सिअसच्या पुढे सोमवारी गेला.

आज 38 अंशावर पारा पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली. यादरम्यान दमट वातावरणही राहिल. 38 अंश सेल्सिअस पारा असताना घराबाहेर पडणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामुळे उन्ह लागण्याची शक्यता अधिक आहे, यादरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळलेले अधिक फायदेशीर आहे. यासोबतच पाणीसोबत ठेवणेही आवश्यक आहे.

यासोबतच राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि गारपिट होत आहे. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्येच आता उष्णता देखील वाढत आहे. राज्यात पुढील काही दिवसात उष्णता अधिक वाढण्याचे संकेत आहेत. दोन ते तीन दिवसात अवकाळी पावसाचे संकट जाईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us