AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापाच्या अंत्यसंस्काराचा व्हिडिओ मागवला… आईच्या मयतालाही आल्या नाही ! अखेर वृद्धाश्रमाचं मोठं पाऊल; तिन्ही मुलींना…

हरियाणातील सोनीपतमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलींसाठी आयुष्यभर झटलेले शिवचरण गुप्ता वृद्धाश्रमात दाखल झाले. पत्नीच्या निधनानंतर त्यांचाही आश्रमातच मृत्यू झाला. मुलींना शिक्षिका व बँक कर्मचारी बनवूनही, त्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला येऊ शकल्या नाहीत. व्हिडिओ कॉलवर अखेरचा निरोप घ्यावा लागला, ज्यामुळे बदलत्या कौटुंबिक नात्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बापाच्या अंत्यसंस्काराचा व्हिडिओ मागवला... आईच्या मयतालाही आल्या नाही ! अखेर वृद्धाश्रमाचं मोठं पाऊल; तिन्ही मुलींना...
बापाच्या अंत्यसंस्काराचा व्हिडिओ मागणाऱ्या मुलींबाबत आश्रमाने घेतला मोठा निर्णय
| Updated on: Aug 08, 2026 | 5:19 PM
Share

आयुष्यभर मुलांसाठी झटणाऱ्या आई-वडिलांना शेवटच्या क्षणी मुलांची साथ मिळावी, एवढीच अपेक्षा असते. मात्र, हरियाणातील सोनीपत येथील एका घटनेने बदलत्या कौटुंबिक नात्यांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सोनीपत येथून नात्यांमधील बदलती परिस्थिती दाखवणारी एक अत्यंत भावूक घटना समोर आली आहे.  एकेकाळी कापडाचे मोठे व्यापारी असलेले शिवचरण रामरतन गुप्ता यांनी आपल्या तीनही मुलींना शिकवलं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. मात्र, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात, अखेरच्या काळात त्यांना वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली. तिथेच त्यांची अखेर झाली, मात्र तेव्हा किंवा मृत्यूनंतरही त्यांच्या मुली काही आल्या नाहीत.

व्यवसायात मोठे नुकसान झाल्यानंतर  गुप्ता यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे अखेर त्यांना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागला. ज्या तीन मुलींशी ते दिवसातून दोन-तीन वेळा व्हिडिओ कॉलवर बोलायचे, वडिलांच्या निधनानंतर त्याच मुली अंतिम दर्शनासाठी प्रत्यक्षात मात्र पोहोचू शकल्या नाहीत. अखेर आश्रम व्यवस्थापनानेच गुप्ता यांचेअंत्यसंस्कार केले आणि मुलींनी व्हिडिओ कॉलवरूनच त्यांना अखेरचा निरोप दिला. त्यासाठी मुलींनी पैसेही पाठवले होते , मात्र नंतर आश्रमाने मोठा निर्णय घेत ते पैसे परत पाठवले.

पत्नीचाही आश्रमातच झाला मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार,  शिवचरण मूळचे महाराष्ट्रातील होते. सोनीपतच्या ककरोई गावात त्यांचे काही नातेवाईक राहत होते. 2024 मध्ये ते सोनीपत येथील ‘आपना घर’ आश्रमात दाखल झाले. कापडाच्या व्यवसायात मोठे नुकसान झाल्याने आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी निर्माण झाल्याचे त्यांनी आश्रम व्यवस्थापनाला सांगितले होते.

काही दिवसांनी ते पत्नी मीना गुप्ता यांनाही आश्रमात घेऊन आले. दोघेही पती-पत्नी तेथे एकत्र राहू लागले. 12 ऑक्टोबर 2024 रोजी मीना गुप्ता यांचे आश्रमातच निधन झाले. आश्रमाने त्यांच्या तीनही मुलींना आईच्या निधनाची माहिती दिली. मात्र, त्यावेळी आईच्या अंत्यसंस्कारासाठी एकही मुलगी आली नाही. यानंतर शिवचरण यांनी आश्रमातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने पत्नीवर अंत्यसंस्कार केले. एवढेच नाही तर नंतर हरिद्वारला जाऊन त्यांनी पत्नीच्या अस्थींचे विसर्जनही केले.

मुलींवर जीवापाड प्रेम करणारे वडील

आश्रमाच्या संचालिका सारिका कालरा यांच्या सांगण्यानुसार, शिवचरण आपल्या तीनही मुलींवर खूप प्रेम करत होते. एक मुलगी नेपाळमध्ये, एक सूरतमध्ये तर एक उत्तर प्रदेशात राहत होती. दोन मुली शिक्षिका होत्या, तर एक एचडीएफसी बँकेत नोकरी करत होती.

शिवचरण दिवसातून दोन-तीन वेळा मुलींशी व्हिडिओ कॉलवर बोलायचे. त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे, याची त्यांना सतत काळजी असायची. कुटुंब पुन्हा एकत्र यावं, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. व्यवसायात झालेल्या नुकसानीनंतरही त्यांची स्वप्नं मात्र संपली नव्हती. त्यांना पुन्हा एकदा कापडाचे दुकान सुरू करायच होतं. , थोडी मदत मिळाली तर ते पुन्हा छोटासा व्यवसाय उभा करतील, असं ते आश्रमात ते अनेकदा सांगायचे.

एक मुलगी वडिलांना भेटायलाही आली होती

आश्रमातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठी मुलगी नीता अग्रवाल यांचा गुप्ता यांच्याशी वेळोवेळी संपर्क होता. वडिलांना औषधे, कपडे किंवा इतर काही गरज असल्यास त्या मदत करत असत. गेल्या वर्षी, 2025 साली त्या आश्रमातही आल्या होत्या आणि काही काळ वडिलांसोबत राहिल्या होत्या. त्यानंतर त्या पुन्हा परत गेल्या.

शिवचरण यांनी 12 मार्च 2026 रोजी आश्रम सोडला. दिल्लीमध्ये काही पैसे घेणे आणि काही मालमत्तेचे व्यवहार पूर्ण करायचे असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर सोनीपतला परत येऊन पुन्हा छोटासा कापडाचा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, नंतर ते दुसऱ्या एका आश्रमात राहत असल्याची माहिती आश्रम व्यवस्थापनाला मिळाली. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, पण बोलणे होऊ शकले नाही.

वडील आजारी असल्याची माहिती 20 दिवस आधीच दिली होती

दरम्यान, शिवचरण यांची प्रकृती खालावू लागली. आश्रम व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार, सुमारे 20 दिवस आधीच  तीनही मुलींना देण्यात त्यांच्या आजाराची माहिती आली होती. निधनाच्या चार दिवस आधीही मुलींना वडील आजारी असून त्यांना भेटण्याची इच्छा असल्याचे सांगितलं होतं. मात्र, तरीही एकही मुलगी वडिलांना भेटण्यासाठी पोहोचली नाही.   अखेर मंगळवारी रात्री उशिरा शिवचरण रामरतन गुप्ता यांचे निधन झाले. निधनाची माहिती मिळाल्यानंतर आश्रमाने पुन्हा एकदा मुलींशी संपर्क साधला आणि अंत्यसंस्कारासाठी येण्याचे आवाहन केले. मात्र, अंतर आणि वेळेचे कारण देत त्यांनी येणे शक्य नसल्याचे सांगितले.

5100 रुपये पाठवले, पण अंत्यसंस्कारासाठी आल्या नाहीत

नेपाळमध्ये शिक्षिका असलेल्या मोठ्या मुली अनीता यांनी ऑनलाइन 5100 रुपये पाठवले. वडिलांवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्याची विनंती त्यांनी केली. तीनही मुलींनी व्हिडिओ कॉलद्वारे वडिलांना अखेरचा निरोप दिला. त्यानंतर त्यांनी अंत्यसंस्काराचा व्हिडिओही मागितला. अस्थी विसर्जनाबाबतही त्यांनी आश्रम व्यवस्थापनाशी चर्चा केली. दूर असल्यामुळे अस्थी विसर्जनाची जबाबदारीही आश्रमानेच घ्यावी, अशी विनंती मुलींनी केली. मात्र, आश्रम व्यवस्थापनाने मुलींनी पाठवलेले 5,100 रुपये परत केले

आयुष्यात पहिल्यांदाच अंत्यसंस्कार व्हिडिओ कॉलवर दाखवावे लागले

एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना व्हिडिओ कॉलवर अंत्यसंस्कार दाखवण्याची वेळ त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच आली, असं आश्रमाशी संबंधित एका समाजसेवकाने सांगितलं.  ही घटना अत्यंत वेदनादायक असल्याचे त्यांनी म्हटलं. या प्रकरणावर अद्याप मुलींच्या बाजूने कोणतीही सविस्तर सार्वजनिक प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?