AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा पावसाचे संकट! 5 जिल्ह्यांमध्ये मोठा धोका, हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तास..

गेल्या काही दिवसांपासून सतत हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आज पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आजही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागकडून देण्यात आला.

पुन्हा पावसाचे संकट! 5 जिल्ह्यांमध्ये मोठा धोका, हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तास..
Rain
| Updated on: Mar 24, 2026 | 7:09 AM
Share

मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी उष्णता तर कधी पाऊस अशी स्थिती आहे. गेल्या चार ते पाच दिवसापासून अनेक भागात सतत पाऊस कोसळत आहे. अवकाळी पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच अनेक भागात उष्णता देखील वाढत आहे. यादरम्यानच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज वर्तवला आहे. आज राज्यातील अनेक भागातील हवामानात चढउतार बघायला मिळेल. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आजही वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. कोकणात आज दमट आणि उष्ण वातावरण राहण्याचा अंदाज आहे. उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा देत येलो अलर्ट कोकणात देण्यात आला. वाशिम येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली.

वाशिम येथे उच्चांकी 37.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमान नोंदवले गेले. धुळ्यात 13.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. आज धाराशिव, लातूर, सोलापूर, नांदेड आणि लातूर या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल. या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.

मराठवाड्यातील अनेक भागात गेल्या आठवड्यापासून अवकाळी पाऊस सतत हजेरी लावत आहे. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. रब्बीचे पिक शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने मोठे चिंतेचे वातावरण आहे. मार्च महिन्याती पाऊस होत असल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे. सांगली, सातारा आणि सोलापूरमध्येही अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले.

बुलढाणा जिल्ह्यात मागील आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे 13 तालुक्यांतील 201 गावांमधील 6460 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान सिंदखेड राजा, मेहकर तालुक्यांत तुलनेने नुकसान कमी आहे. प्रशासनाने नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून प्राथमिक अंदाजानुसार मलकापूर आणि लोणार तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. यामध्ये गहू, ज्वारी, हरभर, कांदा सह इतर पिकांचा समावेश आहे. प्रशासनाकडून सध्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मात्र, पाऊस असूनही काही थांबण्याचे नाव घेत नाही.

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन