AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SLC XI : यशस्वी जैस्वाल या गोलंदाजांचा बनला गिऱ्हाईक, श्रीलंकेत पोल-खोल, 0 वर OUT

IND vs SLC XI : टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल या खास प्रकारच्या गोलंदाजांचा गिऱ्हाईक बनत चालला आहे. त्यांच्या गोलंदाजीचं यशस्वी जैस्वालकडे उत्तरच नाही. यशस्वीला त्यांची गोलंदाजी खेळणचं झेपत नाहीय.

IND vs SLC XI : यशस्वी जैस्वाल या गोलंदाजांचा बनला गिऱ्हाईक, श्रीलंकेत पोल-खोल, 0 वर OUT
yashasvi jaiswal Image Credit source: PTI
| Updated on: Aug 08, 2026 | 1:43 PM
Share

Yashasvi Jaiswal Struggle Against Left-Arm Pacer : भारत-श्रीलंकेमध्ये दोन टेस्ट मॅचची सीरीज होणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा सराव सामना सुरु आहे. या सराव सामन्यातून टीम इंडियाच्या कमकुवत बाजू उघड होत चालल्या आहेत. भारतीय टीमचा ओपनर यशस्वी जैस्वालच्या खराब फॉर्मने टीम इंडियाची चिंता वाढवली आहे. कोलंबोच्या नॉन्डिसक्रिप्ट्स क्रिकेट क्लबवर श्रीलंका प्लेइंग XI विरुद्ध सराव सामना सुरु आहे. या सामन्यात यशस्वीला भोपळाही फोडता आला नाही. अवघ्या 2 चेंडूत त्याने पॅव्हेलियनची वाट धरली. पुन्हा एकदा यशस्वीला डावखुऱ्या गोलंदाजाने गुंडाळलं. डावखुऱ्या गोलंदाजांनी यशस्वीची कमजोरी हेरली आहे. श्रीलंका प्लेइंग XI ने 8 विकेट गमावून 363 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर केएल राहुलसोबत यशस्वी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरला होता. श्रीलंकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज विश्वा फर्नांडोने यशस्वीला सहज जाळ्यात अडकवलं. इनिंगच्या दुसऱ्या चेंडूवर ऑफ-स्टंप बाहेर जाणारा चेंडू यशस्वी कुठल्याही फुटवर्क शिवाय खेळायला गेला. त्याने बॅट फिरवली पण चेंडू सहज फिल्डरच्या हातात विसावला. त्याने सोपा झेल दिला.

कसोटी क्रिकेटमध्ये लेफ्ट-आर्म पेस गोलंदाजांचा सामना करणं यशस्वी जैस्वालसाठी दिवसेंदिवस आव्हानात्मक बनत चाललं आहे. डावखुऱ्या गोलंदाजांसमोर यशस्वीचं तंत्र कमी पडतय. टेस्ट क्रिकेटमध्ये यशस्वी जैस्वालला आतापर्यंत 9 वेळा डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने आऊट केलय. मागच्यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात WTC टेस्ट सीरीज झाली. त्यावेळी चार पैकी तीनवेळा मार्को जॅनसनने त्याला आऊट केलं. भारताने ही मालिका 0-2 ने गमावली.

कितीवेळा शुन्यावर OUT

मार्को जॅनसन शिवाय कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि दक्षिण आफ्रिकेच्या नांद्रे बर्गरने सुद्धा त्याला 3-3 वेळा आऊट केलय. यशस्वीच्या या प्रदर्शनाने आगामी दोन कसोटी सामन्यांच्या सीरीजसाठी टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं आहे. श्रीलंका त्याच्या या कमकुवत बाजूचा पूर्णपणे फायदा उचलण्याचा प्रयत्न करणार. कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वीच्या अलीकडच्या इनिंगचे आकडे पाहिले, तर त्याचा संघर्ष पूर्णपणे कळून येतो. मागच्या पाच टेस्ट इनिंगमध्ये त्याने फक्त एक हाफ सेंच्युरी झळकवली आहे. वॉर्म अप मॅचचा समावेश केल्यास मागच्या 6 इनिंगमध्ये दोनवेळा तो खातं न उघडताच तंबूत परतलाय.

Follow Us
मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा
Video : मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा, गणेशोत्सवाची अनोखी संकल्पना
आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा
Bhandara : आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा संताप
संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा
Video: संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा, पाहून विश्वासच बसणार नाही
चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली
Video : पर्चीवर लिहून म्हणाले पुत्रप्राप्ती होणार, आता चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली; व्हिडीओ व्हायरल!
11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?
By Election : 11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?
युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा
Video : युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा
विशाखा राऊतांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! रिक्त जागेवर...
Vishakha Raut : विशाखा राऊतांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! रिक्त जागेवर...; कोर्टने नेमके काय दिले आदेश?
सोलापुरात पावसाचा येलो अलर्ट: शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, पण...
Video : सोलापुरात पावसाचा येलो अलर्ट: शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, पण दुष्काळाची चिंता कायम
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली..
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली जबाबदारी
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... कारण काय?
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... नेमकं कारण काय?