राज्यातील वातावरणात मोठा बदल, अलर्ट जारी, ढगाळ वातावरणासोबत..

Maharashtra Weather Update : हवामानात प्रचंड बदल होत असून याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती आहे. त्यामध्येच काही राज्यात सध्या मुसळधारा पाऊस सुरू आहे.

राज्यातील वातावरणात मोठा बदल, अलर्ट जारी, ढगाळ वातावरणासोबत..
Cloudy weather
| Updated on: Jan 25, 2026 | 7:23 AM

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी राहणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, जानेवारी महिन्यात तापमानात बदल होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्यातील थंडीच्या तुलनेत या महिन्यात थंडी नाही. जानेवारीची 25 तारीख आली. मात्र, अजून थंडी काही वाढली नाही. उत्तरेकडे कडाक्याची थंडी असून पारा खाली जात आहे. त्या तुलनेत राज्यात काहीच थंडी नाही. उलट वायू प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. फक्त थंडीच नाही तर काही राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू असून काही तासांसाठी भारतीय हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला आहे. राज्यात तापमानात चढउतार बघायला मिळत आहे. सकाळी काही प्रमाणात गारठा असतो आणि दुपारच्यावेळी उकाडा जाणवतो आहे.

पंजाबच्या भटिंडा येथे देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. भटिंडा येथे 0.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 10.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. निफाड येथे 32.6 अंश तापमानाची नोंद झाली. आज मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.काही भागात धुक्याचा अनुभवही घेता येईल.

राज्यातील हवामानातील चढउताराचा आरोग्यावर थेट परिणाम होताना दिसत आहे. वायू प्रदूषणामुळे श्वसनाशी संबंधित आजार लोकांमध्ये वाढले आहेत. देशातून मॉन्सून जाऊन अनेक महिने झाली आहेत. मात्र, पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. राज्यातही वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. 1 जानेवारीला झालेल्या पावसानंतर राज्यातील थंडी गायब झाली.

शनिवारी दिल्लीत किमान तापमान 6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले तर कमाल तापमान 16 ते 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, उत्तरे प्रदेश, हिमाचल प्रदेश या भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शिवाय प्रचंड प्रमाणात तिथे थंडी देखील आहे. नवी मुंबईमध्ये वायू प्रदूषण वाढल्याने थेट संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली.