AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजही तो कोसळणार.. पावसाचा अलर्ट, वातावरणात होणार मोठा बदल, थेट..

हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आजही काही भागात पावसाचा मोठा इशारा दिला. पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.

आजही तो कोसळणार.. पावसाचा अलर्ट, वातावरणात होणार मोठा बदल, थेट..
Rain
| Updated on: Apr 07, 2026 | 7:04 AM
Share

राज्यात मागील काही दिवसांपासून पाऊस सतत हजेरी लावताना दिसत आहे. पावसामुळे मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. अवकाळी पाऊस राज्यातून जाण्याचे नाव घेत नाही. गारपिटीसह पाऊस होताना दिसत आहे. त्यामध्येच आजही वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. आज राज्यात तापमानात चढउतार बघायला मिळेल. काही भागात उष्णता वाढण्याचे संकेत आहेत. गेल्या आठ दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून अवकाळीचे ढग राज्यावर होते. आता कुठे अवकाळी पाऊस कमी होताना दिसत आहे. मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. गडचिरोली आणि चंद्रपूर सोडले तर राज्यातील इतर भागात आज उष्णता वाढण्याचे संकेत आहेत.

अनेक दिवसानंतर पावसापासून दिलासा मिळत आहे. रब्बीचे हाताशी आलेले पिक शेतकऱ्यांचे गेले. अकोला येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोल्यात 37.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद महाबळेश्वर येथे झाली. महाबळेश्वर येथे नीचांकी 13.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. सोलापूरमध्येही कडाक्याचे उन्ह होते. सोलापूरात 37 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान नोंदवले गेले.

जळगाव जिल्ह्यातील आंबा उत्पादकांनाही अवकाळी आणि वादळाचा फटका बसला. पंचनामे करून मदतीची मागणी आंबा उत्पादक शेतकऱ्याकडून होत आहे. जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादक शेतकरी आहेत. सलग दोन ते तीन दिवस अवकाळी पाऊस आणि वादळी वारा यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून शेतकरी चिंतेत आहेत.

नाशिकच्या निफाड तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांना मोठा फटका बसला. कोटमगाव येथील शेतकऱ्याच्या टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने आता तोंडाशी आलेला घास हिरावला. गेल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामध्येच आजही काही भागात पाऊस पडणार आहे.

Follow Us
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम