IMD Weather Update : पुन्हा राज्यावर संकट! अवकाळी पाऊस कोसळणार, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये..

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवस अवकाळीचे ढग कायम राहणार आहेत.

IMD Weather Update : पुन्हा राज्यावर संकट! अवकाळी पाऊस कोसळणार, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये..
Rain
| Updated on: Mar 22, 2026 | 7:20 AM

मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहेत. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. मार्च महिन्यातही पाऊस पडताना दिसत आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक भागात गारपिटही झाली. 20 मार्च 2026 पर्यंत हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, आता पुन्हा एकदा पुढील काही दिवसांसाठी भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला. राज्यात अवकाळी पावसाचे ढग काही जाण्याचे नाव घेत नाहीत. राज्यातील हवामानात पावसाला पोषक वातावरण असल्याने रविवार, सोमवार आणि मंगळवारीही राज्यातील अनेक भागात पाऊस होण्याचा अंदाज आहे. आज राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

परभणी, बीड, धाराशिव, लातूर, पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, नांदेड, हिंगोली, गोदिंया, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस मंगळवारी हजेरी लावण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. रायगड, ठाणे मुंबईमध्ये उष्णता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे.

18 आणि 19 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेती पिकाचे निफाड तालुक्यात मोठे नुकसान झाले. द्राक्ष, कांदा, मका, गहू या पिकांचे सर्वाधिक नुकसान. बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार परिसरासह आसपासच्या गावांना अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलाय.अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे रब्बी हंगामातील उभी पिके मोठ्या प्रमाणात आडवी झाली आहेत.

प्रामुख्याने रब्बी हंगामातील गहू,ज्वारी यांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी पिके पूर्णपणे जमिनीवर कोसळल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नुकसानीमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी,अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

Follow Us