AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे प्रवाशांनो प्लॅन बदला… रेल्वे प्रवासात अचानक मोठे बदल, अनेक गाड्या रद्द; नेमकं काय घडलं?

राजनांदगाव-कलमना रेल्वे मार्गावर तिसऱ्या लाईनच्या जोडणीसाठी ८ दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे २४ ते ३१ जानेवारी दरम्यान १४ महत्त्वाच्या मेमू आणि पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.

रेल्वे प्रवाशांनो प्लॅन बदला... रेल्वे प्रवासात अचानक मोठे बदल, अनेक गाड्या रद्द; नेमकं काय घडलं?
indian railways
| Updated on: Jan 21, 2026 | 10:11 AM
Share

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि तितकीच चिंतेची बातमी आहे. नागपूरच्या राजनांदगाव ते कलमना दरम्यान रेल्वेच्या तिसऱ्या लाईनचे काम सुरू होणार आहे. या कामामुळे रेल्वे प्रशासनाने २४ जानेवारी ते ३१ जानेवारी या ८ दिवसांच्या कालावधीत १४ गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.

भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) विभागात पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. राजनांदगाव ते कलमना दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनच्या जोडणीचे (Non-Interlocking work) काम सुरू करण्यात आले आहे. या तांत्रिक कामामुळे २४ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या दरम्यान रेल्वे वाहतुकीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

आतापर्यंत किती गाड्या रद्द?

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राजनांदगाव-कलमना हा विभाग अत्यंत गजबजलेला असून येथे गाड्यांचा वेग आणि क्षमता वाढवण्यासाठी तिसरी लाईन जोडणे आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक विस्कळीत होणार असली तरी भविष्यात रेल्वेचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. सध्या ऐन प्रवासाच्या दिवसांत गाड्या रद्द झाल्याने नोकरदार, विद्यार्थी आणि दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे नियोजन कोलमडणार आहे.

यामुळे रद्द करण्यात येणाऱ्या १४ गाड्यांमध्ये प्रामुख्याने लोकल पॅसेंजर आणि मेमू (MEMU) गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या २४ जानेवारी ते ३१ जानेवारी या ८ दिवसांच्या कालावधीत धावणार नाहीत.

  • तुमसर रोड-तिरोडी पॅसेंजर (सर्व फेऱ्या)
  • तिरोडी-तुमसर रोड पॅसेंजर
  • इतवारी-तिरोडी पॅसेंजर
  • बालाघाट-इतवारी-तिरोडी मेमू स्पेशल
  • दुर्ग-गोंदिया मेमू पॅसेंजर
  • गोंदिया-दुर्ग मेमू पॅसेंजर
  • इतवारी-गोंदिया मेमू
  • गोंदिया-इतवारी मेमू
  • डोंगरगड-गोंदिया मेमू स्पेशल
  • गोंदिया-डोंगरगड मेमू स्पेशल

रेल्वे विभागाचे प्रवाशांना आवाहन

तसेच काही गाड्या त्यांच्या पूर्ण मार्गावर न धावता अर्ध्यावरच थांबवल्या जातील. ज्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा फटका बसेल.  तुमसर रोड ते तिरोडी दरम्यान धावणाऱ्या सर्व डेमू (DEMU) गाड्या या प्रवासाच्या मध्यभागी थांबवल्या जातील. तर बालाघाट ते तिरोडी दरम्यानच्या डेमू गाड्या देखील त्यांच्या शेवटच्या स्थानकापर्यंत पोहोचणार नाहीत.

या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, रेल्वे स्थानकावर येण्यापूर्वी १३९ या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा रेल्वेच्या अधिकृत ॲपवर आपल्या ट्रेनची खात्री करून घ्यावी. रद्द केलेल्या गाड्यांच्या जागी प्रवाशांना पर्यायी खासगी वाहनांचा किंवा बसचा आधार घ्यावा लागणार आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.