
गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. अशातच आता आज (शनिवार 16 ऑगस्ट) मुंबई विमानतळावर एक मोठा अपघात टळला. इंडिगो एअरलाइन्सचे एक विमान लँडिंगवेळी अनियंत्रित झालं होते. या विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळले असल्याचे समोर आले आहे. मात्र यामुळे कोणताही अपघात झाला नाही, त्यामुळे विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, इंडिगोच्या A321 विमानाचा मागच्या भागाने लँडिंगवेळी धावपट्टीवर आदळला. कंपनीने म्हटले की, खराब हवामानामुळे पायलटने लँडिंगऐवजी पुन्हा टेकऑफचा निर्णय घेतला, त्यामुळे विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला. या घटनेत कोणतेही नुकसान झालेले नाही. त्यामुळे नुकसान टळले आहे.
इंडिगोने एका निवेदनात म्हटले की, “16 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत खराब हवामान होते. त्यामुळे कमी उंचीवर उड्डाण करत असताना इंडिगो एअरबस ए321 या विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला. मात्र विमानाने पुन्हा उड्डाण घेतले आणि ते सुरक्षितपणे उतरले. आता हे विमान पुन्हा सेवेत उतरवण्यासाठी आवश्यक तपासणी, दुरुस्ती आणि मंजुरी घ्यावी लागणार आहे.’
इंडिगोने निवेदनात म्हटलं की, ‘प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा याला इंडिगोचे प्राधान्य आहे. यामुळे आमच्या कामकाजावर होणारा परिणाम टाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या घटनेनंतर विमान ग्राउंड करण्यात आले असून डीजीसीएला त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. आता या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता आहे.
डीजीसीएच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, ‘आम्ही या घटनेची चौकशी करू. हे विमान 6E 1060 होते, जे बँकॉकहून मुंबईला येत होते. शनिवारी पहाटे 3:06 वाजता धावपट्टी 27 वर उतरत असताना हा किरकोळ अपघात झाला. खराब हवामानामुळे ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत कोणताही प्रवासी किंवा क्रू मेंबर जखमी झाला नाही. त्यामुळे मोठे नुकसान टळले आहे.