AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा शाही विवाहसोहळा, डोळे दिपवणारा रुखवत, वस्तूंची यादी वाचून थक्क व्हाल

आज इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा शाही लग्नसोहळा पार पडत आहे. तब्बल 100 एकरच्या भव्य परिसरात लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या लग्न सोहळ्यातील रुखवत देखील आकर्षक बनवण्यात आला आहे.

इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा शाही विवाहसोहळा, डोळे दिपवणारा रुखवत, वस्तूंची यादी वाचून थक्क व्हाल
Indorikar MaharajImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 03, 2026 | 5:40 PM
Share

प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलप यांचा विवाहसोहळा आज पार पडत आहे. हा विवाहसोहळा सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. तब्बल 100 एकराच्या परिसरात या भव्य-दिव्य विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विवाह सोहळ्याला राजकीय, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रातील दिग्गज लोकं उपस्थित राहणार आहेत. दरम्यान यापूर्वी इंदोरीकर महाराज यांनी आपली मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख यांच्या साखरपुड्यावरही मोठा खर्च केला होता, यावरून महाराजांवर मोठी टीका झाली. त्यानंतर आता हे लग्न देखील चांगलंच चर्चेत आलं आहे. इंदोरीकर महाराज हे आपल्या किर्तनातून नेहमी लोकांना साधेपणानं लग्न करा असा सल्ला देतात, मग महाराजांनी आपल्या मुलीच्या लग्नावर एवढा खर्च कसा केला? असा सवाल काही जणांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा शाही विवाहसोहळा पार पडत आहे. विवाहस्थळी भव्य रुखवताची मांडणी करण्यात आली आहे. रुखवतातील पारंपारिक देखाव्यांनी सर्वांच लक्ष वेधल आहे. ग्रामीण संस्कृतीची जिवंत झलक या रुखवताच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. हे रुखवत लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी खास आकर्षण ठरलं आहे. विवाह जमवण्यापासून ते लग्नाच्या सर्व विधींची सुंदर सांगड, या रुखवतामध्ये पहायला मिळत आहे. साखरपुडा, हळद, वऱ्हाडींचे स्वागत ते मुख्य विवाह सोहळा अशा प्रत्येक टप्प्यांचं सादरीकरण या रुखवतामध्ये करण्यात आलं आहे. पारंपारिक वस्तू, शेतीशी निगडीत देखावे, जुन्या संस्कृतीचं दर्शन, विविध गोडधोड पदार्थांची आकर्षक मांडणी या रुखवतामध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्रीयन परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम, या रुखवतामध्ये पहायला मिळत आहे.

शाही व्यवस्थेमुळे लग्न सोहळा चर्चेत

सध्या राज्यभरात इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या या लग्न सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या लग्न सोहळ्यासाठी तब्बल 100 एकराच्या परिसरात लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या लग्नसोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती आहे. यापूर्वी आपल्या मुलीच्या साखर पुड्यात देखील महाराजांनी मोठा खर्च केला होता. या साखर पुड्याची देखील जोरदार चर्चा झाली होती.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!