AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indurikar Maharaj : अनेक वाहनांचा मालक… अलिशान बंगला आणि 24 तास हरिपाठ… अशी आहे इंदोरीकर महाराजांच्या जावयाची लाइफस्टाईल

प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या लेकीचा विवाह साहिल चिलप यांच्याशी होत आहे. साहिलचे वडील सुनील चिलप हे नवी मुंबईतील यशस्वी उद्योजक आहेत, ज्यांची MS लॉजिस्टिक्स कंपनी आहे. गरिबीतून वर येऊन त्यांनी कंटेनर ट्रान्सपोर्टचा व्यवसाय मोठा केला. पनवेलमध्ये आलिशान घर आणि वारकरी सेवा करणारी त्यांची कुटुंब परंपरा आहे.

Indurikar Maharaj : अनेक वाहनांचा मालक... अलिशान बंगला आणि 24 तास हरिपाठ... अशी आहे इंदोरीकर महाराजांच्या जावयाची लाइफस्टाईल
इंदोरीकर महाराजांच्या लेकीचा आज विवाह
| Updated on: May 03, 2026 | 2:36 PM
Share

प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा म्हणजे ज्ञानेश्वरीचा आज शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. 100 एकरवर हा लग्न सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी आलिशान मंडपही बांधण्यात आला आहे. पाहुण्यांची आणि वऱ्हाडी मंडळींची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून स्वत: इंदोरीकर महाराजांनी खबरदारी घेतली आहे. स्वत: तयारीची पाहणी करून त्यांनी काय हवंय काय नको याची माहिती घेतली आहे. इंदोरीकर महाराजांची लेक चिलप कुटुंबाची सून होणार आहे. चिलप कुटुंब हे मूळचे जुन्नरचं आहे. पण सध्या मुंबईत पनवेल या ठिकाणी राहत आहे. इंदोरीकर महाराज यांचा जावई सध्या काय करतो? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरीकर महाराजांचा जावई अत्यंत श्रीमंत कुटुंबातील आहे.

इंदोरीकर महाराज यांची लेक ज्ञानेश्वरी हिचा विवाह साहिल चिलप यांच्याशी आज होत आहे. अहिल्यानगरच्या संगमनेर येथील गुंजाळवाडी येथे हा विवाह सोहळा आज पार पडणार आहे. 100 एकर जागेवर हा विवाह सोहळा होत आहे. त्यासाठीची सर्व तयारी पार पडली आहे. मुख्यमंत्र्यांपासून अनेक दिग्गज या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. इतरांना भर कीर्तनातून साधं लग्न करण्याचा सल्ला देणाऱ्या इंदोरीकरांनी अत्यंत थाटात लग्न सोहळा आयोजित केल्याने आता त्यांच्यावर टीका होत आहे.

कोण आहेत साहिल?

नवी मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक सुनील विष्णू चिलप आणि मनिषा सुनील चिलप यांचे साहिल हे चिरंजीव आहेत. साहिल यांचे वडील सुनील चिलप हे नवी मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक आहे. पनवेलच्या खांदा कॉलनीत त्यांचं अलिशान घर आहे. तसेच मूळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे येथील हे कुटुंब आहे. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशीच काटेडे गावात त्यांचा अलिशान बंगला आहे. या अलिशान बंगल्यातून भव्य शिवनेरी किल्ला दिसतो. चिलप यांचं कुटुंब अत्यंत धार्मिक आहे. त्यांच्या घरात 24 तास हरीपाठ असतो. त्यामुळे घरात प्रसन्न असं वातावरण असतं.

गरीबीतून उद्योजक

चिलप कुटुंब हे मूळचे शेतकरी आहे. त्यांच्याकडे आजही 9 ते 10 एकर शेती आहे. सुनील चिलप यांची हालाखीची परिस्थिती होती. त्यांनी सुरुवातीच्या काळात ट्रान्सपोर्टमध्ये नोकरी केली. तर मनिषा चिलप या गृहिणी आहेत. हे अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंब आहे. नोकरीच्या निमित्ताने सुनील चिलप हे 2003मध्ये नवी मुंबईत आले. तिथेच त्यांनी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. मोठ्या मेहनतीने हा व्यवसाय वाढवला. आणि उंचीवर नेला. चिलप कुंटुंबाकडे अनेक वाहनं आहेत. आताच्या घडीला चिलप कुटुंबाकडे 100 ते 125 कंटेनर आहेत. न्हावाशेवा येथे त्यांची एमएस लॉजिस्टिक नावाची कंपनी आहे.

वारकऱ्यांची सेवा

चिलप कुटुंब हे वारकऱ्यांची सेवा करणारे आहे. मुंबईत पनवेलला खांदा कॉलनीत ते राहतात. 15 ते 20 वर्षापासून चिलप आणि इंदुरीकर कुटुंबाचे संबंध आहेत. साहिल चिलप यांचे काकाही वारकऱ्यांची सेवा करतात. ते खांदा कॉलनीत दरवर्षी वारकऱ्यांना अन्नदान करतात. देणग्या देतात. समाजात कार्यकरणारं असं हे कुटुंब आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी