AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mercury Transit 2026: बुध ग्रह पुढच्या काही तासात कर्क राशीत करणार गोचर, या राशींसाठी अच्छे दिन

Budh Gochar 2026: राशीचक्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशीबदल करत असोत. बुध ग्रह आता कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे राशीचक्रातील काही राशींना लाभ मिळणार आहे.

Mercury Transit 2026: बुध ग्रह पुढच्या काही तासात कर्क राशीत करणार गोचर, या राशींसाठी अच्छे दिन
Mercury Transit 2026: बुध ग्रह पुढच्या काही तासात कर्क राशीत करणार गोचर, या राशींसाठी अच्छे दिनImage Credit source: TV9 Network
| Updated on: Aug 03, 2026 | 11:03 PM
Share

बुध ग्रह हा सूर्याच्या जवळचा ग्रह असून राशी गोचर करण्याचा कालावधी वेगाने होत असतो. आता 5 ऑगस्ट 2026 रोजी बुध ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. 5 ऑगस्ट 2626 रोजी बुध ग्रहाचे गोचर संध्याकाळी 7.58 वाजता होणार आहे. हे गोचर मिथुन राशीतून कर्क राशीत होणार असून, या काळात बुध पुनर्वसू नक्षत्रात असेल. या राशीत 22 ऑगस्ट 2026 पर्यंत विराजमान असेल. बुध ग्रह कर्क राशीमध्ये एकूण 17 दिवस असेल. या कालावधीत त्याचा परिणाम राशीचक्रावर दिसून येईल. कारण कर्क ही चंद्राची अधिपत्य असलेली रास आहे. त्यात बुध ग्रह बुद्धि, वाणी, व्यवसाय, शिक्षण आणि विचारांचा दैवत मानलं जाते. त्यामुळे मनाचा कारक असलेल्या चंद्राच्या राशीत बुध येणार आहे. या 17 दिवसांच्या कालावधीत कर्क राशीमध्ये ‘बुधादित्य राजयोग’ आणि ‘त्रिग्रही योग’ प्रभावी असेल. त्याचा लाभ काही राशींना मिळणार आहे. वृषभ, मिथुन, कन्या, तूळ आणि मकर या राशींच्या जातकांना लाभ मिळेल.

या राशींना मिळणार लाभ

वृषभ: या राशीच्या तृतीय स्थानात बुध ग्रह असणार आहे. या स्थितीमुळे या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. बैठका, मुलाखती आणि प्रत्येक चर्चांच्या विषयात यश मिळेल. आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. नोकरी-व्यवसायात घेतलेले धाडसी निर्णय फायदेशीर ठरतील. उपाय: तुम्ही बुधवारी हिरव्या भाज्या दान कराव्यात.

मिथुन : या राशीच्या द्वितीय स्थानात बुध ग्रह असणार आहे. खरं तर हे धन आणि वाणीचं स्थान आहे. त्यामुळे या काळात तुमच्या संवाद कौशल्य अधिक प्रभावी ठरेल. त्यामुळे तुमची रखडलेली कामही पूर्ण होतील. काही धनयोग जुळून येऊ शकतात. उपाय : ओम बं बुधाय नमः या मंत्राचा जप करावा.

तूळ: या राशीच्या दहाव्या स्थानात बुध ग्रह विराजमान होणार आहे. कर्म आणि करिअरचं स्थान आहे. त्यामुळे या कालावधीत नोकरी आणि व्यवसायात मोठी प्रगती होईल. नवीन नोकरीच्या चांगल्या संधी चालून येतील. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल.क्षुल्लक बाबींमध्ये अडकून न पडता, केवळ तुमच्या मोठ्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. उपाय: तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे गरजू व्यक्तीला दान करावेत.

मकर: या राशीच्या सप्तम स्थानात बुध ग्रह बसणार आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनातील काही मतभेद संपून गोडवा वाढेल. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर आर्थिक लाभ मिळेल. नवीन व्यवसायासाठी 17 दिवसांचा कालावधी चांगला राहिल. उपाय: तुम्ही नियमितपणे विष्णू सहस्रनामाचे पठण करावे.

(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा