
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर देशमुख यांच्या मुलीचा साखपुडा मोठ्या थाटमाटात पार पडला. सध्या त्यांच्या लेकीच्या साखरपुड्याचीच चर्चा सुरु आहे. त्यांनी ज्या शाहीपद्धतीने लेकीचा साखरपुडा केला त्यावरून त्यांना ट्रोल केल जात आहे.

इंदुरीकर महाराजांनी नेहमी आपल्या कीर्तनातून समाजाचं प्रबोधन केलं आहे. एका कीर्तनात त्यांनी लग्नात होणाऱ्या खर्चावर तर त्यांनी परखड भाष्यही केलं होतं. पण त्यांनी लेकीचा साखरपुडा अतिशय थाटामाटात केला. एसी हॉल, सोन्याचे दाग-दागिने अन् लग्नालाही लाजवेल असा शाही थाट पार पडला. त्यामुळे त्यांनी केलेल्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. हा साखरपुडा सोहळा संगमनेरमधील वसंत लॉन्स इथं पार पडला. या सोहळ्याला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थितीत होते.

इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल यांची एका रथातून एंट्री झाली.

एवढंच नाहीतर इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि नवरा मुलगा साहिलसाठी सोन्याचे बरेच दागदागिनेही केल्याचं पाहायला मिळालं. या फोटोत सोन्याच्या दागिन्यांनी भरलेला ट्रे दिसत आहे. त्यावरून या साखरपुड्यात इंदुरीकरांनी नक्की किती खर्च केलाय याचा अंदाज नक्कीच लक्षात येत आहे.

इंदुरीकर महाराज यांनी लेकीच्या साखरपुड्यावर इतका खर्च केल्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका होताना दिसत आहे.

पण यासोबतच मुलीच्या साखरपुड्यात आलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा मात्र त्यांनी टाळला आहे. इंदुरीकर महाराज यांनी 1 लाख 11 हजार एवढी रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिली आहे.