Vedio : Devendra Fadnavis l ममतांच्या दौऱ्यात उद्योग हा बहाणा, मूळ उद्देश राजकीय-देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्टया मजबूत राज्य आहे. आपण फार मोठे आहोत असा विचार राज्याने करू नये. मुख्यमंत्री येतात आणि अपील करतात. कालचा दौरा मूळ अजेंडा राजकीय होता, असंही फडणवीस म्हणाले.

Vedio : Devendra Fadnavis l ममतांच्या दौऱ्यात उद्योग हा बहाणा, मूळ उद्देश राजकीय-देवेंद्र फडणवीस
Devendra Fadanvis

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. उद्योगासाठी हा दौरा केला, अशा त्या भासवत असल्या तरी त्यांचा मुळ उद्देश हा राजकीय असल्याचं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय.

मुंबईत वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री येत असतात. महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्टया मजबूत राज्य आहे. आपण फार मोठे आहोत असा विचार राज्याने करू नये. मुख्यमंत्री येतात आणि अपील करतात. कालचा दौरा मूळ अजेंडा राजकीय होता, असंही फडणवीस म्हणाले.

काँग्रेसला बाजूला ठेवून ममतांची आगेकूच

काँग्रेसला बाजूला ठेवून ममता दीदी मोट बांधत आहेत. काँग्रेस संपत चालली आहे. त्यानंतर तृणमूल काँग्रेस हाच दुसरा पर्याय आहे, असे ममता भासवत आहेत. यासाठीच त्यांची धडपड सुरू आहे. त्याला शरद पवारांची साथ आहे. कारण शरद पवार हे स्वतंत्रपणे राज्यात लढू शकत नाहीत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत. ममता दीदी थेट बोलतात आणि पवार बिट विन द लाईन बोलतात. दोघांनाही काँग्रेसला बाजूला ठेवायचे आहे. राज्यात काँग्रेसला घेतल्याशिवाय राष्ट्रवादीकडे पर्याय नाही. शिवसेनेने गुप्त भेट केली तरी काही फायदा होणार नाही. 2024 देखील केंद्र सरकार हे मोदींचे असेल. केंद्रात सत्ता हस्तगत करण्याचे हे प्रयोग 2019 साली देखील झाले. पण, मोंदींना काहीही फरक पडला नाही. 2024 साली लोक मोदी यांच्यावर विश्वास ठेवतील, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

 

शिवसेनेची दुटप्पी भूमिका

आम्ही प्रत्येक मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. पण, आताच राज्य सरकार ममता दीदी आल्या की त्यांचे स्वागत आहे. पण भाजपचा मुख्यमंत्री आला की टीका केली जाते, ही राज्य सरकारची दुटप्पी भूमिका असंही फडणवीस म्हणाले. संजय राऊत इतक्या मोठ्या बाता करतात. पण त्यांचे 56 आमदार आहेत. शिवसेनेने कितीही लांगून चालन केले तरी काही फायदा होणार नाही, असं मतही फडणवीस यांनी व्यक्त केलं.

 

शिवसेनेचे सावरकर प्रेम बेगडी

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, शिवसनेचे वि. दा. सावरकर यांच्याविषयीचे प्रेम बेगडी दिसून आले आहे. आज त्यांच्या पक्षाचे खासदार अपमान करत आहेत. पण, सावरकर हे कायमच भारतरत्न आहेत. सावरकरांना नसेल मानायचे तर मानू नका. पण, त्यांचा अपमान करू नका, असंही फडणवीस यांनी शिवसेनेला खडसावले.

संबंधित बातम्या

आशिष शेलार, तुम्ही गुजराती शिकून घ्या; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शेलारांना टोला कशासाठी?

शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना-काँग्रेस, पाचव्यांदा पक्षांतर, बाळ्या मामा म्हात्रे आता राष्ट्रवादीत

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा ‘व्हायब्रंट गुजरात’साठी मुंबईत रोड शो चालतो का?; संजय राऊतांचा शेलारांना सवाल

 

Published On - 2:37 pm, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI