AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, शिवसेना नेत्याच्या मनात खदखद, गोगावले बीडच्या दौऱ्यावर असताना नेमकं काय घडलं?

मोठी बातमी समोर येत आहे, पुन्हा एकदा महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना नेत्याकडून भरत गोगावले यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार करण्यात आली आहे. आपल्याला न्याय मिळत नसल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, शिवसेना नेत्याच्या मनात खदखद, गोगावले बीडच्या दौऱ्यावर असताना नेमकं काय घडलं?
BHARAT GOGAWALEImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 14, 2026 | 9:29 AM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. पुन्हा एकदा महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी गेवराई शहरात आयोजित पक्षाच्या बैठकीमध्ये बीडचे गेवराई विभाग जिल्हाप्रमुख चंद्रकांत नवले यांनी गोगवले यांच्याकडे राष्ट्रवादीची तक्रार केली आहे. इथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजय पंडित आहेत. त्यामुळे न्याय मिळत नाही, असं यावेळी चंद्रकांत नवले यांनी म्हटलं आहे. मात्र जरी असं असलं तरी देखील आपण पक्षवाढीसाठी काम करणार आहोत आणि मरेपर्यंत आपण शिवसेनेतच राहू असंही ते यावेळी म्हणाले.

गोगावले यांनी यावेळी चंद्रकांत नवले यांची तक्रार ऐकून घेतली आहे. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की,   हरकत नाही आपला आमदार नाही. जिथे आपला आमदार नाही तिथे काय अडचणी येतात हे आम्हाला माहिती आहे. तुम्हाला ताकद देण्यासाठीच मी इथे आलो आहे. आपल्याला संघटनेला मोठं करण्यासाठी काम करायचं आहे, असा यावर गोगावले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अजूनही रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भरत गोगावले हे उत्सुक आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने मंत्री आदिती तटकरे या देखील उत्सुक आहेत. यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना आता भरत गोगावले यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

आमचे नेते एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. त्यातून नक्कीच सकारात्मक निर्णय होईल. पावणे दोन वर्षे थांबलो आहे, सब्र का फल मीठा होता है आणि हे फळ भरतशेठलाच मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले आहे. तटकरे यांच्या पुतण्याला आता आमदारकी मिळाली आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाचा आमचा मार्ग मोकळा झाला असल्याचे देखील भरत गोगावले यांनी म्हटले असून, 15 ऑगस्ट झेंडा देखील मीच फडकवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर