Chandrapur : आंतरराज्यीय गांजा तस्करांना अटक, 33 लाखांचा गांजा जप्त

चंद्रपुरात (Chandrapur) आंतरराज्यीय गांजा तस्करांना (Smugglers) अटक (Arrest) करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 125 किलो वजनाचा 33 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Mar 27, 2022 | 12:49 PM

चंद्रपुरात (Chandrapur) आंतरराज्यीय गांजा तस्करांना (Smugglers) अटक (Arrest) करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 125 किलो वजनाचा 33 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. चिचपल्ली गावाजवळ दोन वाहने थांबवून तपासणी केली असता हा गांजा आढळून आला. श्रीनिवास नरसय्या मिसिडी, शंकर बालय्या घंटा अशी दोघांची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईमुळे अवैध गांजातस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यात बाहेरून मोठ्या प्रमाणात गांजा येत असल्याचे पाहायला मिळते. पोलिसांनाही याविषयी माहिती झाली होती. त्यानंतर वाहनांची विशेषत: बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत होती. त्यातच हा एवढा मोठा गांजा पोलिसांना सापडून आला आहे. आता याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें