अबू आझमींच्या घरावर ED चे छापे? कुठे कुठे कारवाई? आझमी काय म्हणाले पाहा Video!

कुलाबा येथील कमल मेंशन येथे ही छापेमारी झाली आहे. आभा गुप्ता आणि अबू आझमी यांचे ऑफिस येथेच आहे, अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे.

अबू आझमींच्या घरावर ED चे छापे? कुठे कुठे कारवाई? आझमी काय म्हणाले पाहा Video!
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 2:41 PM

मुंबईः समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party) नेते अबू आझमी (Abu Azmi) यांच्या विविध संपत्तींवर छापेमारी सुरु असल्याचे वृत्त आहे. त्यांच्या मुंबईतील घरावरही आयकर तसेच ईडीच्या  अधिकाऱ्यांचे छापे (IT Raid) पडल्याची माहिती आहे. मुंबई (Mumbai) आणि लखनौ येथील अबू आझमींच्या घरावर ही कारवाई सुरु असल्याचं वृत्त आहे. अबू आझमी यांनी हे वृत्त नाकारलं आहे. माझ्यापर्यंत तरी अशी माहिती आलेली नाही, असं आझमी म्हणालेत.

अबू आझमी यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं असल्याचंही म्हटलं जातंय. मात्र या अफवा कुठून आल्या माहिती नाही. माझ्या मुंबईतल्या घरावरही छापे पडलेले नाहीत, असं अबू आझमी यांनी स्पष्ट सांगितलं…

संपत्तीवरील छापेमारीचं वृत्त अबू आझमी यांनी नाकारलं असलं तरीही माझ्या व्यवसायासंबंधी काही प्रकरण असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईतल्या घरी माझी पत्नी असून तिच्याशीही माझं आताच फोनवर बोलणं झालंय. कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही, असं अबू आझमी म्हणाले.

मात्र अकोला येथील दौरा अबू आझमी यांनी अचानक रद्द केला आहे. ते मुंबईच्या दिशेने रवाला झाले आहेत.

पाहा अबू आझमी काय म्हणाले?-

आयकर विभागाने समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या निकटवर्तीय आभा गणेश गुप्ता यांच्या संपत्तीवर छापेमारी झाल्याचं वृत्त आहे. बेनामी संपत्ती आणि काळ्या पैशांसंबंधीचे आरोप आयकर विभागाचे असल्याचं म्हटलं जातंय. आझमी यांच्याशी संबंधित मुंबई, वाराणसी, कानपूर, दिल्ली, कोलकाता और लखनौ आदी शहरांतील ३० ठिकाणांवर ही छापेमारी झाली आहे.

अबू आझमी हे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत. तर आभा गुप्ता या अबू आझमी यांच्या निकटवर्तीय आणि सपाचे माजी महासचिव गणेश गुप्ता यांच्या पत्नी आहेत. गणेश गुप्ता यांचं निधन झालंय. आभा गुप्तांच्या कंपन्यांसंबंधी ठिकाणांवर छापेमारी झाली आहे.

कुलाबा येथील कमल मेंशन येथे ही छापेमारी झाली आहे. आभा गुप्ता आणि अबू आझमी यांचे ऑफिस येथेच आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.