मंदिर तोडणाऱ्याला तोडण्याची वेळ आली, भाजप आमदाराचे चिथावणीखोर विधान

| Updated on: Nov 25, 2021 | 10:05 PM

कल्याण पश्चिमेमधील दामोदराचार्य हॉलमध्ये भाजपकडून मच्छी विक्रेत्यांना आजपासून अधिकृत परवाने देण्याची सुरुवात करण्यात आली. हा परवाना केडीएमसीकडून दिला जात आहे. भाजपचे पदाधिकारी चेतन पाटील आणि आामदार रमेश पाटील यांनी यासाठी एका वर्षापूर्वी केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली होती.

मंदिर तोडणाऱ्याला तोडण्याची वेळ आली, भाजप आमदाराचे चिथावणीखोर विधान
ramesh patil
Follow us on

ठाणे : “कल्याण परिसरातील मोहने येथे एका मंदिरावर विना परवानगी ज्या अधिकाऱ्याने कारवाई केली. त्याला तोडायची वेळ आली आहे,” असे वादग्रस्त विधान कल्याणमधील भाजप आमदार रमेश पाटील यांनी केलंय. या विधानानंतर आता कल्याणमध्ये वेगळा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच अधिकाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. या संदर्भात आयुक्तांना आम्ही भेटणार आहोत असे पाटील म्हणाले. विशेष म्हणजे पाटील यांनी कल्याण बंद करण्याचा इशारा दिलाय.

त्याला तोडायची वेळ आली

कल्याणमध्ये महापालिकेकडून मासेविक्रेत्यांना अधिकृत परवाने देण्यात येत आहेत. भाजपच्या वतीने यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मासेविक्रेते मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. तसेच आमदार रमेश पाटील आणि भाजप आमदार रविंद्र चव्हाण हेदेखील उपस्थित होते. यावेळई आमदार रमेश पाटील यांनी वादग्रस्त विधान केले. मोहने परिसरातील एका मंदिरावर विना परवानगी ज्या अधिकाऱ्याने कारवाई केली; त्याला तोडायची वेळ आपल्यावर आली आहे, असं रमेश पाटील यांनी म्हटलंय. या विधानांतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत विचारले असता मंदिरावर कारवाई करणााऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची आमची मागणी आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

मासे विक्रेत्यांना परवाने देण्यास सुरुवात

कल्याण पश्चिमेमधील दामोदराचार्य हॉलमध्ये भाजपकडून मच्छी विक्रेत्यांना आजपासून अधिकृत परवाने देण्याची सुरुवात करण्यात आली. हा परवाना केडीएमसीकडून दिला जात आहे. भाजपचे पदाधिकारी चेतन पाटील आणि आामदार रमेश पाटील यांनी यासाठी एका वर्षापूर्वी केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. कल्याण डोंबिवलीतील जवळपास 750 मच्छी विक्रेत्यांना परवाने दिले जाणार आहेत. आज काही विक्रेत्यांना प्रातिनिधिक स्वरुपात परवाने दिले. भाजप आमदार चव्हाण आणि पाटील यावेळी उपस्थित होते.

नेमकं प्रकरण काय आहे?

कल्याण पश्चिम येथे एका बांधकामावर कारवाई करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचे प्रभाग अधिकारी राजेश सावंत मोहने परिसरात 17 नोव्हेंबर रोजी पोहोचले होते. त्यांनी कारवाई सुरु करण्याआधीच स्थानिक गावकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. तरीदेखील महापालिकेच्या पथकाने या बांधकामावर कारवाई केली होती.कारवाई करुन महापालिकेचे अधिकारी सावंत प्रभाग कार्यालयात परतले होते. या दरम्यान माजी नगरसेवक मुकुंद कोट आणि स्थानिक नागरिक कार्यालयात पोहोचले होते. यादरम्यान सावंत आणि कर्मचाऱ्यांसमोर कोट समर्थकांनी गोंधळ घातला होता. हा वाद नंतर विकोपाला गेल्यामुळे मुकुंद कोट यांनी सावंत यांच्या कानशिलात लगावली होती. त्याचा व्हीडीओ व्हायरल झाला होता.

संबंधित बातम्या

केंद्राचा वीज क्षेत्राच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडा, ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा हल्लाबोल

परमबीर सिंह यांचा जबाब नोंदवला, उद्या पुन्हा चौकशीसाठी हजर व्हावे लागणार ?