AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्व कबुतरखाने तात्काळ सुरू करा अन्यथा… जैन मुनींनी घेतली राहुल नार्वेकर यांची भेट, उपोषणाचा इशारा अन्

राज्यभरातील कबूतरखाने बंद करण्यात आली. त्यातच आता जैन समाजाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. जर कबूतरखाने सुरू झाली नाही तर आम्ही उपोषण करणार असल्याचा इशारा देण्या आला. हेच नाही तर अन्याय होत असल्याचेही त्यांनी म्हटले.

सर्व कबुतरखाने तात्काळ सुरू करा अन्यथा... जैन मुनींनी घेतली राहुल नार्वेकर यांची भेट, उपोषणाचा इशारा अन्
Muni Nileshchandra Maharaj Rahul Narvekar
| Updated on: Sep 21, 2026 | 8:31 AM
Share

राज्यातील कबुतरखाने बंद करण्यात आली. मात्र, याला जैन समाजाने मोठा विरोध केला. फक्त विरोधच नाही तर त्यांच्याकडून मोठे आंदोलनही दादरच्या कबुरखान्याजवळ करण्यात आले. पालिकेने बंद केलेला कबुतरखाना त्यांच्याकडून सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अजूनही कबुतरखान्यासाठी जैन समाज आग्रही आहे. जैन समाज मोठ्या संख्येने कबुतरखाना परिसरात पोहोचला होता. त्यावेळी महापालिकेने लावलेली ताडपत्री जैन समाजाकडून काढून टाकण्यात आली होती. त्यातच आता पुन्हा कबुतरखाने सुरू करण्यासाठी जैन समाजाकडून प्रयत्न केली जात आहेत. तश्या हालचालीही सुरू असल्याचे बघायला मिळतंय. 8 महिन्यानंतर राहुल नार्वेकर आणि मुनी निलेशचंद्र यांची भेट झाली. मुंबईतील सर्व कबुतरखाने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

मुंबईत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुनी निलेशचंद्र महाराज यांची 8 महिन्यानंतर पुन्हा भेट झाली. 8 महिन्यांपूर्वी आझाद मैदानावर जैन समाजाच्या आंदोलनादरम्यान विधानसभा अध्यक्षांनी कबुतरांना न्याय मिळेल असे आश्वासन दिले होते. मात्र, 8 महिने उलटूनही मुंबईतील सर्व कबुतरखाने बंदच असल्याच सांगितलं आहे

पायधुनी येथील गोडी जी पार्श्वनाथ जैन मंदिरासह संपूर्ण मुंबईतील कबुतरखान्यांमध्ये शांतिदूतांचा दाणा पाणी बंद असल्याचे त्यांनी सांगितले. भेटीत मुनींनी विधानसभा अध्यक्षांना या प्रकरणाची आठवण करून देत लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी केली. जर संपूर्ण मुंबईतील सर्व कबुतरखाने तात्काळ उघडण्यात आले नाहीत, तर  गोडी पार्श्वनाथ जैन मंदिर, पायधुनी समोर मोठे आंदोलन करू.

आमरण उपोषण आम्ही सुरू करू. यावेळी ऐकणार नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असे मुनी निलेशचंद्र यांनी म्हटले आहे. ज्यामुळे आता पुन्हा एकदा कबुतरखान्यासाठी जैन समाज आक्रमक होताना दिसत आहे. फक्त आक्रमकच नाही तर यावेळी त्यांनी थेट उपोषणाचा इशाराही दिला. यासोबतच कोणाचेही यावेळी ऐकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फक्त मुंबईच नाही तर राज्यभरातील कबुतरखाने सुरू करण्यावर त्यांनी भाष्य केले आहे.

Follow Us
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट