AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Narvekar : ..तर पक्ष फुटणार नाहीत, सुप्रीम कोर्टात खटला सुरु असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं महत्वाचं विधान

विधीमंडळात युवकांसंदर्भातील कायदे करण्याचे निर्णय घ्यावे लागत असतात यासाठी आपण जेन- झी पिढीशी संवाद साधल्याचे असे यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.

Rahul Narvekar : ..तर पक्ष फुटणार नाहीत, सुप्रीम कोर्टात खटला सुरु असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं महत्वाचं विधान
rahul narvekar
| Updated on: Aug 22, 2026 | 6:59 AM
Share

महाराष्ट्रातील ‘जेन-झी’ (Gen-Z) महाराष्ट्रासोबतच आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या बैठका या कधीही कुठल्या ‘ऑपरेशन’ साठी होत नाहीत. मला वाटतं कुठल्याही पक्षाने अंतर्गत लोकशाहीचा वापर करून आपल्या लोकप्रतिनिधींच्या भावना समजून घेतल्या तर पक्ष फुटणारच नाहीत, अशी टिप्पणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पंढरपुरात केली आहे.एकीकडे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह यावर मॅरेथॉन सुनावणी सुरु असताना त्यांनी हे वक्तव्य केल्याने ते चर्चेत आले आहेत.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज पंढरपुरात स्वेरीज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे जेन- झी पिढीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी राजकीय प्रश्नांवर भाष्य करताना ही टिप्पणी केली. तसेच धनुष्यबाणा संदर्भात सुरू असलेला खटला हा न्यायप्रविष्ठ प्रश्न आहे आणि आपण विधानसभा अध्यक्ष आणि कायद्याचा विद्यार्थी असल्याने यावर बोलणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

राहुल गांधी सध्या ‘जेन-झी’ ( Gen-Z ) सोबत आंदोलन करीत आहेत. पण , भारत हा सर्वात्तम देश घडवण्याचे काम युवापिढी करत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी भान ठेवावे. आपल्या राजकारणासाठी युवा पिढीला चेतवून राजकारण करण्याचे काम करू नये. राजकारण सोडून युवा पिढीला योग्य मार्गदर्शन करावे, असाही सल्ला यावेळी राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेत बसून युवकांच्या अपेक्षा, इच्छा आहेत , त्यापूर्ण करायच्या असतील आणि त्या संदर्भातील कायदे करण्याचे निर्णय घ्यायचे असतील. तर युवकांशी संवाद साधणे गरजेचे आहे. यासाठीच आपण जेन – झीशी संवाद साधला असल्याचेही नार्वेकर यांनी सांगितले.

मॅरेथॉन सुनावणी सुरु

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह यावर चार वर्षानंतर सलग मॅरेथॉन सुनावणी सुरु झाली आहे. गेल्या आठवड्यापासून शिवसेना उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद करत निवडणूक आयोगाचा निर्णय कसा चुकीचा होता याचे अनेक दाखले दिले, त्यानंतर शिवसेनेचे दुसरे एक वकील देवदत्त कामत यांनी देखील आपला युक्तीवाद केला. त्यांनी देखील युक्तीवाद करताना निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांचा निर्णय कसा चुकीचा आणि पक्षांतर बंदी विरोधी कायद्याला हरताळ फासणारा आहे हे न्यायालयात सांगितले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या सोमवारी सुरु होणार आहे.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?