AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांच्यानंतर कामत यांचीही मागणी

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या याचिकेवल सर न्यायाधीश सुर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे. या याचिकेवर गेले पाच दिवस शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला होता. आज शिवसेना ठाकरे गटाचे देववत्त कामत युक्तीवाद करत आहे.

...तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांच्यानंतर कामत यांचीही मागणी
uddhav thackeray and eknath shinde
| Updated on: Aug 20, 2026 | 4:33 PM
Share

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना अपात्रता आणि राजकीय पक्ष आणि निवडणूक चिन्ह यावर मॅरेथॉन सुनावणी सुरु आहे. या सुनावणीत गेले पाच दिवस ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल युक्तीवाद करत होते. आता शिवसेना उद्धव ठाकरे यांचेच वकील देवदत्त कामत यांचा युक्तीवाद सुरु आहे. देवदत्त कामत यांनी जर निवडणूक चिन्ह कोणाकडे द्यायचे नसेल तर ते चिन्ह गोठवा अशी मागणी वकील देवदत्त कामत यांनी केले आहे. विशेष म्हणजे काल कपिल सिब्बल यांनी देखील निवडणूक चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती.

पाच पैकी तीन आमदार फुटले तर पक्ष त्यांचा होणार का असा सवाल यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे यांचे वकील देवदत्त कामत यांनी यावेळी केला आहे. सर्वोच्च न्यायालय न्यायाधिकरणासाठी आहे सर्वोच्च न्याय देण्यासाठी नाही. राजकीय पक्ष फुटला तर चिन्हाचा प्रश्न येतो, येथे विधीमंडळ पक्ष फुटलेला आहे. तुम्ही फुट पडली आहे की नाही याचा निर्णय घ्यायचा आहे असे वकील देवदत्त कामत यांनी सर्वाेच्चन्यायालयाला सांगितले.

आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. हा निर्णय आता पुन्हा तुम्ही निवडणूक आयोगाकडे पाठवू नका. सर्वोच्च न्यायालयाने आता आमदार अपात्रता प्रकरण आमदारांची टर्म संपलेली असल्याने अकॅडमीक उरलेले आहे असे सांगितले.यावेळी देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालयाला आमदार अपात्रेचा निर्णय देण्याचा अधिकार असून यापूर्वी अनेक निकालात सर्वोच्च न्यायालयाने असे निकाल दिल्याचे दाखले यावेळी देवदत्त कामत यांनी दिले. यावर सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला हा अधिकार आहे हे ठावूक आहे असे वक्तव्य केले आहे.

कामत यांचा पाऊण तास युक्तीवाद

आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या वरील विश्वास गमावला आहे. त्यांनी केवळ विधीमंडळ पक्षाला समोर ठेवून निकाल दिला आहे असेही देवदत्त कामत यांनी सांगितले. कामत यांनी आज पाऊणतास युक्तीवाद केला. देवदत्त कामत यांचा युक्तीवाद आज संपलेला आहे. उद्या आता शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा युक्तीवाद सुरु होणार आहे.त्यांच्या तर्फे न्यायालयात काय बाजू मांडली जाते. याकडे आता लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश सुर्य कांत यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२७ रोजी संपणार आहे.त्या आधी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन निकाल अपेक्षित आहे. त्यामुळे या केसमध्ये आता काय होणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात