AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ओ नेते…’ तिकडून आवाज आला, अरविंद सावंतांनी मागे वळून पाहताच…कोर्टाच्या आवारात दिलजमाई!

खरी शिवसेना कोणाची ? असा वाद सुप्रीम कोर्टात रंगला असताना कोर्टाबाहेर मात्र शिवसेनेचे नेते अरविंद सावंत आणि एकनाथ शिंदे यांचे नेते राजू वाघमारे यांनी एकमेकांना शेकहँड केल्याचे दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

'ओ नेते...' तिकडून आवाज आला, अरविंद सावंतांनी मागे वळून पाहताच...कोर्टाच्या आवारात दिलजमाई!
Raju Waghmare and Arvind Sawant shake hands each other outside court
| Updated on: Aug 18, 2026 | 6:42 PM
Share

एकीकडे शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावरुन सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना, ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांना एकनाथ शिंदे गटाचे नेते राजू वाघमारे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात ‘ओ नेते’ अशी हाक मारली आणि मग अरविंद सावंत यांनी देखील त्यांच्या हस्तांदोलन केल्याचा प्रकार आज दिल्लीत घडला त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, मागे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील नरेश म्हस्के यांना बोलवण्यासाठी खासदार अनिल देसाई यांना धाडल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. कोर्टात हेवेदावे आणि कोर्टाबाहेर दिलजमाई अशी कॅप्शन या भेटींना न मिळाल्यास नवलच…

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार यावरुन उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांची कोर्टात वकीलांद्वारे डावेपच आणि युक्तीवाद सुरु आहे. दोन्ही पक्षात खरी शिवसेना कोणाची ? असा वाद रंगला असताना कोर्टाबाहेर मात्र शिवसेनेचे नेते अरविंद सावंत आणि एकनाथ शिंदे यांचे नेते राजू वाघमारे मात्र एकमेकांना शेकहँड करताना दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षात फुटीनंतर जवळपास चार वर्षांनी मॅरथॉन सुनावणी सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे वकील सुप्रीम कोर्टात पक्ष आपलाच असल्याचा युक्तीवाद करत आहेत. गेल्या आठवड्यापासून ही सुनावणी सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह चुकीच्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांना बहाल केल्याचा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.

दोन्ही शिवसेना नेत्यात वैर

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे हे एकमेकांना पाण्यात पाहात असताना या दोन्ही पक्षातील नेते मात्र वैर विसरुन जुन्या मैत्रीला जागताना अधून मधून दिसत असतात. उद्धव ठाकरे यांना विधीमंडळातील कार्यकाळ संपला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात उद्धव ठाकरे यांचा पिंड राजकारणाचा नाही असे वक्तव्य केले होते. त्यानंतर विधीमंडळात फोटोसेशल सुरु असताना उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या दिशेने खुर्चीवर बसण्यासाठी चालत आले तेव्हा तेथे मध्य भागी दोनच खुर्च्या रिकाम्या होत्या. ज्यावेळी उद्धव जवळून पास झाले तेव्हा एकनाथ शिंदे यांनी आपला चष्मा पुसण्याच्या बहाण्याने नजरानजर होऊ दिली नाही हा प्रसंग कॅमेऱ्यांनी अचूक पकडला होता.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात