AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री सायेब… लाडकी बहीण योजना लयभारी, मग मेव्हण्यानं काय घोडं मारलं? खानदेशी शेतकऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल

या योजनेवरुन एका शेतकऱ्याने सरकारला टोला लगावला आहे. मुख्यमंत्री साहेब, लाडका मेव्हणा योजना सुरू करा अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे.

मुख्यमंत्री सायेब... लाडकी बहीण योजना लयभारी, मग मेव्हण्यानं काय घोडं मारलं? खानदेशी शेतकऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना
| Updated on: Jul 02, 2024 | 1:02 PM
Share

Ladki Bahin Yojana in Maharashtra : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मांडलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेला सुरुवात झाली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. सोमवारी 1 जुलैपासून या योजनेला सुरुवात झाली आहे. आता या योजनेवरुन एका शेतकऱ्याने सरकारला टोला लगावला आहे. मुख्यमंत्री साहेब, लाडका मेव्हणा योजना सुरू करा अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे.

जळगावमधील एका शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक शेतकरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेबद्दल भाष्य करताना दिसत आहे. त्याने एका व्हिडीओद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साद घातली आहे.

मेव्हण्यांसाठी पण अशीच योजना सुरु करा, शेतकऱ्यांची मागणी

मुख्यमंत्री साहेब बहिणींसाठी तुम्ही खूप चांगली योजना सुरु केली. मग मेव्हण्यांसाठी पण अशीच योजना सुरु करा ना… मेव्हन्यानी तुमचं काय घोडं मारलं आहे. मुख्यमंत्री साहेब त्यांनाही हजार पाचशे रुपये द्या, अशी मागणी एका शेतकऱ्यांना दिले आहे.

हा व्हिडीओ जळगावातील एका खानदेशी शेतकऱ्याचा आहे. यात हा शेतकरी खानदेशी या बोली भाषेतून मुख्यमंत्र्‍यांपुढे आपलं मागणं मांडत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खानदेशी बोली भाषेतल्या शेतकऱ्याच्या व्हिडीओची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेवरुन या खानदेशी शेतकऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साद घातली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना नेमकी काय?

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. 1 जुलै 2024 पासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. कमीतकमी 3.50 कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे.

या महिलांनाच मिळणार योजनेचा लाभ?

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणं आवश्यक आहे.
  • राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
  • किमान वयाची 21 वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणं आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावं.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...