धामधुमीत लग्न अन् तिसऱ्याच दिवशी वधू पळाली; जळगावात नेमकं काय घडलं?
जळगावातील एका तरुणाचे लग्न एजंटच्या माध्यमातून झाले. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी वधू २.४४ लाख रुपये आणि दागिने घेऊन पसार झाली. यात १ लाख ६० हजार रुपये रोख आणि ८४ हजार रुपयांचे दागिने होते.

जळगावात एजंटच्या मध्यस्थीने लग्न करणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाची २ लाख ४४ हजारांची फसवणूक झाली आहे. जळगावातील रामेश्वर कॉलनी परिसरात लग्नाच्या तिसऱ्या दिवशी वधू दागिन्यांसह रात्री पसार झाली आहे. पत्नी परत येत नसल्याने आणि पैसे, दागिनेही घेऊन गेल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी तरुणाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात वधूसह एजंट आणि इतर दोघे अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
जळगावात एका एजंटच्या मध्यस्थीने 1 लाख 60 हजार रुपये देऊन मुलाचे लग्न केले. यावेळी त्या तरुणाच्या आईने मणी-मंगळसूत्र, कर्णफुले, सोनपोत आदी दागिने लग्नामध्ये वधूला घातले होते. मात्र लग्नाच्या तिसऱ्या दिवशी वधू दागिन्यांसह पसार झाली. यानंतर त्या वराकडील मंडळींची दोन लाख ४४ हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १४ ते २३ फेब्रुवारी दरम्यान घडला.
84 हजार रुपयांचे दागिने घेऊन वधू पसार
याप्रकरणी १३ मार्च रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात वधूसह एजंट आणि इतर दोघे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ८४ हजार रुपयांचे दागिने घेऊन वधू पसार झाली. पत्नी परत येत नसल्याने आणि पैसे, दागिनेही गेल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. एजंट आशाबाई, पूजा गावडे, निर्मलाबाई डोंगरे, शिवशंकर यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.