.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाबराव पाटील यांच्या विरोधात संजय राऊत यांनी थोपटले दंड, गुलाबो गॅंग म्हणत…

संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यात पाचोरा येथील सभेपूर्वी एकमेकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. जळगावमध्ये जाऊन संजय राऊत यांनी पुन्हा आव्हान दिले आहे.

गुलाबराव पाटील यांच्या विरोधात संजय राऊत यांनी थोपटले दंड, गुलाबो गॅंग म्हणत...
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Apr 22, 2023 | 12:20 PM
Share

जळगाव : शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या चांगलीच जुपली आहे. पाचोरा येथे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख तथा खासदार संजय राऊत हे जळगाव दौऱ्यावर आहेत. रविवारी होणाऱ्या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांना त्यांचे राजकीय भविष्य सांगत मूळ शिवसेना जागेवरच असल्याचे सांगत आव्हान दिले आहे. संजय राऊत यांनी यावेळेला स्थानिक राजकारणावरुन गुलाबराव पाटील यांना चिमटेही काढले आहे.

संजय राऊत म्हणाले, मूळ शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे. आमदार आणि खासदार गेले असतील पण मूळ शिवसेना जागेवर आहे. जळगावमधील सर्व पदाधिकारी इथेच आहे. जे आमदार गेले ते परत कधी निवडून येणार नाही. मग निवडणूक आयोग काय नंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह परत आम्हाला देणार आहे का?

पैशाच्या जोरावर आमदार गेले असतील पण शिवसेना जागेवरच आहे. 2024 ला यांचा पराभव निश्चित आहे. कोणत्याही क्षणी निवडणुका घ्या हे सिद्ध होईल. गुलाबराव पाटील यांनी सांगावं मी तिथेच राहून दाखवतो. गुलाबराव पाटील पाटील यांना वाटत असेल की मी त्या हॉटेल मध्ये राहावं तर मी राहून दाखवतो त्यांनी घुसून दाखवावं असं खुलं आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.

खरंतर गुलाबराव पाटील म्हणजे गुलाबो गॅंग आहे. एक चित्रपट होता तसे हे आहे म्हणत संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पाचोरा येथील सभेत आमच्यावर बोलाल तर सभेत घुसेल असं गुलाबराव पाटील म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी घुसून दाखवा असे म्हंटल्यावर गुलाबराव पाटील बॅकफुटवर गेले होते.

त्यानंतर आज पुन्हा संजय राऊत यांना गुलाबराव पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी हॉटेल मध्ये घुसू असा इशारा दिला आहे. त्यावर संजय राऊत यांनी त्यांचे आव्हान स्वीकारत गुलाबराव पाटील सांगत आहे त्याच हॉटेलमध्ये राहून दाखवतो, घुसून दाखवा म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा आव्हान दिलं आहे.

दरम्यान गुलाबराव पाटील यांच्या राजकीय भविष्यावर संजय राऊत यांनी भाष्य करत ते परत निवडून येणार नाही म्हणत हल्लाबोल केला आहे. त्यामुळे पाचोऱ्याच्या सभेपूर्वी संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यात आव्हान प्रतीआव्हान सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर