साहित्य क्षेत्रात खळबळ, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना विद्रोही साहित्य संमेलनात विरोध

"शोभणे यांना आम्ही ओळखत नाही. चुकीच्या पद्धतीने शोभणे आले. तिकडे प्रसिद्धी मिळत नाही म्हणून 50 लोकांना घेऊन रवींद्र शोभणे हे चुकीच्या पद्धतीने विद्रोही साहित्य संमेलनात आले", अशी प्रतिक्रिया साहित्य चळवळीचे अध्यक्ष प्रतिमा परदेशी यांनी दिली.

साहित्य क्षेत्रात खळबळ, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना विद्रोही साहित्य संमेलनात विरोध
Follow us
| Updated on: Feb 04, 2024 | 5:15 PM

किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव | 4 फेब्रुवारी 2024 : जळगावच्या अमळनेरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर आज या संमेलनाचा शेवटचा दिवस आहे. ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र शोभणे हे यावर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. अमळनेरमध्ये सध्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह विद्रोही साहित्य संमेलनदेखील आयोजित करण्यात आलं आहे. रवींद्र शोभणे हे या विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देण्यासाठी गेले. यावेळी त्यांना विरोध करण्यात आला. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. ते अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे यावर्षाचे अध्यक्ष आहेत. अमळनेरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास्थळी सध्या वेगवेगळे कार्यक्रमही सुरु आहेत. असं असताना दुपारच्या सत्रात संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे हे विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देण्यासाठी गेले. त्यावेळी हा सगळा प्रकार घडला.

97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनचे अध्यक्ष रवींद्र शोभणे विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देण्यासाठी आले असता त्यांना या ठिकाणी विद्रोही सहित्यिकांनी विरोध केल्याच्या प्रकाराने राज्याच्या साहित्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. अमळनेर मध्ये 97 व अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरू आहे. तर याच ठिकाणी 18 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन सुद्धा सुरू आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे हे दुपारच्या सुमारास विद्रोही साहित्य संमेलनाचे ठिकाणी भेट देण्यात आले असता त्यांना व्यासपीठाकडे जाण्यासाठी लोकांनी मज्जाव केला. त्यामुळे गोंधळ उडाला. या घटनेनंतर रवींद्र शोभणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. असा कुठलाही प्रकार घडला नाही, अशी प्रतिक्रिया शोभणे यांनी दिली. भेट देण्यासाठी आलो. भेट झाली, असं शोभणे म्हणाले.

‘शोभणे यांना आम्ही ओळखत नाही, ते चुकीच्या पद्धतीने आले’

“शोभणे यांना आम्ही ओळखत नाही. चुकीच्या पद्धतीने शोभणे आले. तिकडे प्रसिद्धी मिळत नाही म्हणून 50 लोकांना घेऊन रवींद्र शोभणे हे चुकीच्या पद्धतीने विद्रोही साहित्य संमेलनात आले. मात्र त्यांना कुठलाही विरोध या ठिकाणी करण्यात आला नाही”, अशी प्रतिक्रिया साहित्य चळवळीचे अध्यक्ष प्रतिमा परदेशी यांनी दिली. उलट शोभणे यांना त्यांनी भेट दिली म्हणून त्यांच्या या ठिकाणी तोंड गोड करण्यात आल्याचे त्यांनी म्हटलं.

शोभणे यांना मिठाई भरवण्यात आली

दरम्यान, गोंधळानंतर लगेच प्रकरण निवाळण्यात आलं. रवींद्र शोभणे यांनी तोंड गोड करुन घेतलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो, असं विद्रोही साहित्य संमेलन संयोजन समितीकडून सांगण्यात आलं. यावेळी शोभणे संयोजकांना आता तुम्ही मनही गोड करुन घ्या, असं आवाहन केलं. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. संबंधित घटनेची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.