AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

20 ते 25 तरुण हातात तलवारी, कोयते अन् बंदुका; अचानक कॉलनीत घुसले अन्.., जळगावमधून हादरवणारी बातमी समोर

जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे,  जळगावच्या तुकारामवाडी परिसरातील सम्राट कॉलनीत चार ते पाच घरांवर तरुणांच्या टोळक्याकडून सशस्त्र हल्ला करण्यात आला आहे.

20 ते 25 तरुण हातात तलवारी, कोयते अन् बंदुका; अचानक कॉलनीत घुसले अन्.., जळगावमधून हादरवणारी बातमी समोर
| Updated on: May 15, 2025 | 4:43 PM
Share

जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे,  जळगावच्या तुकारामवाडी परिसरातील सम्राट कॉलनीत चार ते पाच घरांवर तरुणांच्या टोळक्याकडून सशस्त्र हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. या तरुणांच्या टोळक्याकडून दगडफेक देखील करण्यात आली आहे. तसेच तलवारी व इतर शस्त्रांनी हल्ला करत घराबाहेर पार्क करण्यात आलेल्या दुचाकी आणि चारचाकींची देखील तोडफोड करण्यात आली आहे, या घटनेमध्ये मोठं नुकसान झालं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगावच्या तुकारामवाडी परिसरात असलेल्या सम्राट कॉलनीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 20 ते 25 तरुण हातामध्ये तलवारी, कोयते आणि बंदुका घेऊन कॉलनीमध्ये शिरले त्यांनी दगडफेक केली तसेच आपल्या हातातील शस्त्रांनी कॉलनीमध्ये पार्क केलेल्या वाहनांंवर हल्ला केला, या घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे, अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात आली.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार 20 ते 25 तरुणांचं टोळकं होतं. त्यांच्या हातात शस्त्रं होती. त्यांनी दगडफेक करत वाहनांवर हल्ला केला. कॉलनीमधील रहिवाशांनी दरवाजा न उघडल्यानं तसेच ते यादरम्यान घराबाहेर न पडल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेत नागरिक सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नाहीये.

मिळत असलेल्या माहितीप्रमाणे तब्बल एक तास या तरुणांच्या टोळक्यानं या परिसरात राडा केला. कॉलनीमध्ये पार्क करण्यात आलेल्या दुचाकी आणि चार चाकी वाहनांवर हल्ला करण्यात आला या घटनेत वाहनांचंं मोठं नुकसान झालं आहे. तरुणांच्या दोन गटामध्ये असलेल्या पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर या परिसरामध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कॉलनीमध्ये घुसून राडा करणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...